एक्स्प्लोर

केबीसीमध्ये घडलं ऐतिहासिक नाट्य

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात कम्प्युटरजींनी ऐन कार्यक्रमात दहा मिनिटांसाठी विश्रांती काय घेतली.. केबीसीच्या कार्यक्रमात न भूतो.. अशी गंमत झाली.

मुंबई : एरवी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम लागला की प्रत्येकजण टीव्हीसमोर बसतो. टीव्हीवर एकिकडे बच्चन साहेब बसलेले असतात.. दुसरीकडे स्पर्धक बसलेला असतो. तिसरीकडे प्रेक्षक आणि पुढचे स्पर्धक बसलेले असतात आण या सगळ्यात नेहमी सगळ्यांचं लक्ष असतं ते एकाच गोष्टीकडे. त्याचा आब इतका की दस्तूरखुद्द अमिताभ बच्चनही त्यांना अहोजाहो करतात. त्यांचं नाव कम्प्युटरजी. हेच कम्प्युटरजींनी ऐन कार्यक्रमात दहा मिनिटांसाठी विश्रांती काय घेतली.. केबीसीच्या कार्यक्रमात न भूतो.. अशी गंमत झाली.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा सध्या 12 वा सीझन सुरू आहे. त्यात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ही गंमत घडली. पहिल्या पाटण्याच्या राज लक्ष्मी यांनी 12 लाख 50 हजार रुपये जिंकल्यानंतर त्यांनी हा डाव सोडला. त्यांच्या जागी आले मुंबईचे स्वप्नील चव्हाण. त्यांचं स्वागत अमिताभ बच्चन यांनी केलं. खेळाला सुरूवाझाली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर स्वप्नील यांनी दिल्यानंतर 2 हजार रुपयांसाठी बच्चन साहेबांनी प्रश्न विचारण्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रश्न विचारायची तयारी झाल्यावर बच्चन यांनी कॉम्प्युटरला हुकूम दिला, दोन हजार रुपयों के लिये अगला सवाल.. यह रहा आपके सामने.. असं बच्चन म्हणाले खरं. पण कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर प्रश्नच आला नाही. बच्चन यांनी पुन्हा एकदा दो हजार रुपये के लिये सवाल असं म्हणाले. हे तीनदा झाल्यावरही कॉम्प्युटरवर काही प्रश्न येईना. मग मात्र बच्चन यांनी पाठीमागे आत बघत कॉम्प्युटर हॅंग झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, कॉम्प्युटर तो अटक गया. काही क्षण गेले आणि बिग बी आणि स्वप्नील यांच्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न अवतरला. हे सगळं नाट्य काही सेकंदांचं होतं. पण केबीसीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.

हे सगळं नाट्य घडत जरी असलं तरी बिग बी अमिताभ बच्चन यांनी ती स्थिती अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळली. त्यामुळे काही गडबड झाली नाही. बच्चन यांनी आपल्या नेहमीच्याच पद्धतीन हसत खेळत ती स्थिती नियंत्रणात आणली आणि पुढचा खेळ सुरू झाला. कौन बनेगा करोडपतीचे आजवर 12 सीझन झाले. कोणत्याही सीझनमध्ये कॉम्प्युटरजींनी असा घोळ केला नव्हता. हा शो संपल्यानंतर मजेमजेत बोलताना आपलं मानधन वाढवा असं बहुधा त्या कॉम्प्युटरला सांगायचं असावं असा विनोदही तयार झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Kriti Senon Rahul Gandhi: रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर कंगनाचं पुन्हा भाष्य, आता क्रिती सेनॉनसह राहुल गांधींबाबत म्हणाली....
रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर कंगनाचं पुन्हा भाष्य, आता क्रिती सेनॉनसह राहुल गांधींबाबत म्हणाली....
Awarapan 2 Box Office: यशच्या 'टॉक्सिक'ने बिघडवला 'आवारापन 2'चा खेळ; 12 दिवस घौडदौड, पण 13 व्या दिवशी गती मंदावली, आकडा घसरला, किती कमावले?
यशच्या 'टॉक्सिक'ने बिघडवला 'आवारापन 2'चा खेळ; 12 दिवस घौडदौड, पण 13 व्या दिवशी गती मंदावली, आकडा घसरला, किती कमावले?
Kangana Ranaut on Kriti Sanon: 'मला असं वाटतं की ब्रालेट...' क्रिती सेननच्या कपड्यांवर आक्षेप नाहीच, मग कोणती गोष्ट खटकली?
'मला असं वाटतं की ब्रालेट...' क्रिती सेननच्या कपड्यांवर आक्षेप नाहीच, मग कोणती गोष्ट खटकली?
ठरलं तर मगमध्ये धमाकेदार ट्विस्ट!अटक झालेली सायली आता थेट कोर्टात; नव्या लूकने सगळ्यांनाच केलं थक्क
ठरलं तर मगमध्ये धमाकेदार ट्विस्ट! अटक झालेली सायली आता थेट कोर्टात; नव्या लूकने सगळ्यांनाच केलं थक्क

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Nashik Crime News: पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Embed widget