एक्स्प्लोर

'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...

Kiku Sharda On Kapil Sharma Show: कंटेंट क्रिएटर प्रखर गुप्ता याच्यासोबतच्या एका मुलाखतीत किकू शारदानं 'द कपिल शर्मा शो'चं सीक्रेट सर्वांना सांगून टाकलंय.

Kiku Sharda On Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) टेलिव्हिजन आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या शोपैकी एक. चाहते या शोच्या नव्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत असतात. या शोमध्ये  कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची टीम पाहुण्यांना बोलावून त्यांची फिरकी घेते आणि त्यांच्यावर विनोद करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करते. 'द कपिल शर्मा शो' सुरू झाल्यापासूनच पोट धरुन हसायला तुम्हाला भाग पाडतो. पण, नेमका हा शो सगळा लाईव्ह असतो की, स्क्रिप्टेड असतो? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आता या शोबाबत एक महत्त्वाचा खुलासा या शोमधून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या किकू शारदा यानं केलाय. 

'होय... स्क्रिप्टेड असतो 'द कपिल शर्मा शो'' (Kapil Sharma Show Is Scripted)

कंटेंट क्रिएटर प्रखर गुप्ता याच्यासोबतच्या एका मुलाखतीत किकू शारदानं 'द कपिल शर्मा शो'चं सीक्रेट सर्वांना सांगून टाकलंय. 'द कपिल शर्मा शो'चा बराचसा भाग हा 'स्क्रिप्टेड' असतो, असं किकू शारदानं स्पष्ट केलंय. किकू शारदानं सांगितलं की, शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना विनोद किंवा 'पंचलाईन्स'बद्दल आधीच कल्पना दिली जात नाही. जर त्यांना आधीच माहिती असेल, तर त्यांच्या नैसर्गिक प्रतिक्रिया मिळाल्या नसत्या; कारण टीमला पाहुण्यांकडून अगदी सहज आणि खऱ्या प्रतिक्रिया हव्या असतात. पाहुण्यांना पंचलाईन्स, विनोद किंवा पात्रांबद्दल आगाऊ माहिती असावी, असं त्यांना वाटत नाही. त्यानं सांगितलं की, पाहुण्यांनी मंचावरच त्या पात्रांचा अनुभव पहिल्यांदा घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते, कारण तेव्हाच त्यांच्या खऱ्या प्रतिक्रिया बाहेर येतात. जरी शोसाठी एक स्क्रिप्ट असली, तरी शूटिंगदरम्यान संभाषणातून त्यात बदल केले जातात आणि स्क्रिप्ट रायटर्स त्यात हस्तक्षेप करत नाहीत.

Netflix's 'The Great Indian Kapil Show' Returns With Season 2, Promising a Festival of Laughter – BeingU Studios

"कधीकधी त्या स्क्रिप्टला चिकटून राहणं कठीण..." (Kiku Sharda Revel Kapil Sharma Show)

किकू शारदानं स्पष्ट केलं की, ढोबळमानानं सांगायचं तर त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट असतेच, जिचं ते पालन करतात. पण ती केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. कधीकधी त्या स्क्रिप्टला चिकटून राहणं कठीण जाते, कारण एखादी सेलिब्रिटी पाहुणी व्यक्ती चर्चेला पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेऊ शकते. अनेकदा, ऐन वेळी एखादी नवी कल्पना सुचते आणि त्यामुळे इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं.

कॉमेडियन किकू शारदानं स्पष्ट केलं की, याचं प्रमाण साधारणपणे 70-30 असं असतं. शोचा सुमारे 70 टक्के भाग स्क्रिप्टनुसार चालतो, तर 30 टक्के भाग पूर्णपणे उत्स्फूर्त किंवा परिस्थितीनुसार घडणारा असतो. त्यानं पुढे सांगितलं की, कपिल शर्मा अशा प्रसंगी परिस्थिती हाताळण्यात अत्यंत कुशल आहे. जर एखादा विनोद अपेक्षित परिणाम साधू शकला नाही किंवा शोची दिशा बदलली, तर कपिल ती परिस्थिती सावरून घेतो आणि गोष्टी पुन्हा मूळ मार्गावर आणतो. दरम्यान, किकू शारदा अलिकडेच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसलेला आणि समीर रैना यांच्या शोमध्येही पाहुणा म्हणून सहभागी झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Embed widget