(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : रामाची मूर्ती पाहून कंगणा चांगलीच मोहित झाली; मूर्तीकाराचे केले तोंडभरुन कौतुक
Kangana Ranaut : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी सर्वांना रामाच्या मूर्तीची पाहायला मिळाली आहे. मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Kangana Ranaut : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी सर्वांना रामाच्या मूर्तीची पाहायला मिळाली आहे. मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) हीने रामाच्या मूर्तीचे फोटो शेअर करत मूर्तीकारांचे कौतुक केले आहे. कंगणाने कल्पना केली होती तशीच तिला मोहित करणारी रामाची मूर्ती आहे. कंगणाने श्री रामाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत. कंगणाने मूर्तीचे फोटो शेअर करताना लिहिले की, "मला वाटत होतं रामाची मूर्ती मला तरुणाप्रमाणे वाटेल. मात्र, मी रामाची कल्पना करत होते, त्याच पद्धतीची मूर्ती साकारण्यात आली आहे"
मूर्तीकार योगीराज यांचे कंगणाकडून तोंडभरुन कौतुक
कंगणाने रामाचा आणखी एक फोटो शेअर केला. याबाबत लिहिले की, "किती सुंदर आणि मनाला मोहित करणारी ही मूर्ती आहे. अरुण योगीराज यांच्यावर मूर्ती बनवण्यासाठी किती दबाव असेल. खुद्द एका दगडाला देवाच्या रुपात आणले, ही रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज यांना श्रीरामाने स्वत: दर्शन दिले आहे. तुम्ही धन्य आहात." अरुण हे मूळचे मैसूरचे आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामाच्या मूर्तीची पहिली झलक गुरुवारी (दि.18) सर्वांना पाहायला मिळाली होती.
5 वर्षीय बालराम अयोध्येत दाखल
मीडिया रिपोर्टनुसार, अरुण योगीराज यांनी श्रीरामाची मूर्ती 5 वर्षाच्या बालरामाची कल्पना करुन साकारली आहे. मूर्तीचे वजन जवळपास 200 किलो आहे. शिवाय मूर्ती 18 जानेवारी रोजी आसनस्थ झाली होती. राम भक्तांना 23 जानेवारीपासून रामाचे दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराचे (Ram Mandir) सचिव चंपत राय म्हणाले, राम मंदिरात रामाच्या मूर्तीशिवाय भक्तांची श्रद्धा असेल्या गोष्टी असणार आहेत. राम मंदिरात अनेक देवीदेवतांची मंदिरे असतील. त्यामुळे रामाच्या मूर्तीबरोबरच मंदिरात सीतेची मूर्ती असणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. राम मंदिरात सीतेची मूर्ती नसेल.
विवाह होण्यापूर्वीच्या कालखंडातील राम दर्शवणारी ही मूर्ती असणार आहे. त्यामुळे मंदिरात सीतेची मूर्ती नसेल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सचिव चंपत राय यांनी माहिती दिलीये.अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
इतर महत्वाच्या बातम्या
Kareena Kapoor Khan : तैमूरने स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं अन् इकड करिनाचा आनंद गगनात मावेना!