Kangana Ranaut On Election : कंगनाची राजकारणात एन्ट्री? हिमाचलमधील 'या' जागेवर निवडणूक लढण्याची शक्यता
Kangana Ranaut Will Contest Election : कंगना रनौतने एका शोमध्ये तिच्या राजकारणात एन्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक लढवून जनतेची सेवा करायची आहे, अशी इच्छा कंगनाने व्यक्त केली आहे.
Kangana Ranaut Will Contest Election : बॉलिवूड ( Bollywood ) अभिनेत्री ( Actress ) कंगना रनौत ( Kangana Ranaut ) राजकीय पातळीवरील तिच्या अनेक वक्तव्यांमुळे वादात सापडली होती. कंगना तिच्या ठाम भूमिकेसाठी ओळखली जाते. कंगनानं प्रत्येक वेळी आपली वेगळी आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. आता अभिनेत्री कंगना रनौतची राजकारणातील एन्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आता राजकारणात प्रवेश करण्याची मोठी घोषणा केली आहे.
अलिकडे एका कार्यक्रमामध्ये कंगना रनौतने म्हटलं आहे की, तिला निवडणूक लढवून जनतेची सेवा करायची आहे. हिमाचल प्रदेश पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने आपल्या गावी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कंगनाला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे.
कंगना रनौतने 'आज तक' या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवासाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हिमाचल प्रदेशात पंचायत निवडणुका होणार आहेत. हिमाचल हे कंगनाचे मूळ गाव आहे. हिमाचल प्रदेशात निवडणुका होणार आहेत. याच दरम्यान कंगनाने हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या कंगनाने सांगितलं की, जनतेची इच्छा असेल आणि भाजपने तिला तिकीट दिलं तर ती निवडणूक लढवण्यास तयार आहे.
कुटुंब भाजप समर्थक
कंगनाने यावेळी सांगितलं की, मी राजकीय कुटुंबातून आले आहे. माझे वडीलही राजकारणात होते. माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामं केली. पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर परिस्थिती सुधारली. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर 2014 साली आमचं कुटुंब अधिकृतपणे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये आलं.
मूळ गाव हिमाचलची सेवा करण्याची इच्छा
राजकारणात प्रवेश करण्याबाबत कंगना रनौतने सांगितलं की, भाजप सरकारला माझी साथ हवी असेल तर मी सर्व प्रकारे मदतीसाठी तयार आहे. हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर चांगले होईल. माझ्यासाठी हे सौभाग्य असेल, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.