Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट नेहमी चर्चेत असतात. कंगना वेगवेगळ्या चित्रपटांबद्दलची तिची मत सोशल मीडियावर मांडत असते. काही दिवसांपूर्वी कंगनानं द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कौतुक केलं. नुकताच कंगनानं आरआरआर हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर कंगनानं चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांचे कौतुक केलं आहे.


कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाला सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी प्रश्न विचारतो की, 'कोणता चित्रपट पाहिलास?.' यावर कंगना उत्तर देते, 'आरआरआर' त्यानंतर कंगनानं या चित्रपटाचं कौतुक केलं. ती म्हणाली, 'नॅशनलिज्म हा माझा आवडता विषय आहे. या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.  3D मधील चित्रपट बऱ्याच दिवसांनी पाहिला. लाँग लिव्ह राजामौली. '






आरआरआर चित्रपटामध्ये आलिया भट्ट , अजय देवगन, ज्युनियर एनटीआरआणि राम चरण  यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 120 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी (29 मार्च) या चित्रपटानं 100 कोटीचा आकडा पार केला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटानं सहाव्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 122 कोटींपर्यंत झाले आहे. आरआरआर हा सिनेमा तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha