RRR Box Office Collection : तेलुगू सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरसह (Jr. NTR) अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चौकडीच्या 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या सहा दिवसांत सुमारे 448 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या कमाईने विशेषत: तेलुगू राज्य आणि यूएसएमध्ये अनेक विक्रम मोडल्याचे दिसते. हिंदी मार्केटमध्ये या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली, पण खास गोष्ट म्हणजे ती कायम आहे.


'RRR' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या सहा दिवसांत 448.33 कोटी रुपयांची कमाई केली असून गुरुवारी 27 कोटींची कमाई केली आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास 27 कोटींची कमाई केली. यामध्ये एकट्या हिंदी आवृत्तीने 11.50 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनची कमाई आता 6 कोटींवर आली आहे. शुक्रवारपर्यंत, या चित्रपटाची तेलुगुमधील कमाई 290 कोटी रुपये आणि हिंदीमध्ये 132 कोटी रुपये पार केली आहे.


‘RRR’चे हिंदी व्हर्जन कलेक्शन


शुक्रवार: 19 कोटी


शनिवार: 24 कोटी


रविवार: 31.5 कोटी


सोमवार: 17 कोटी


मंगळवार: 15 कोटी


बिग बजेट चित्रपट


RRR हा खर्चाच्या दृष्टीने देखील मोठा चित्रपट आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेकवेळा उशीर झाला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या बजेटवर देखील वाईट परिणाम झाला आहे. तथापि, एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या चित्रपटातून पैसे कमावले आहेत. नितीश तिवारी यांच्या ‘दंगल’ आणि एसएस राजामौलींच्या ‘बाहुबली 2’ नंतर RRR हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha