The Kashmir Files, Sharad Pawar : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट गेली अनेक दिवस चर्चेत आहे. अनेकांनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही राजकिय नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींना या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मंडले. या चित्रपटावर नुकतच शरद पवार यांनी त्यांचे मत मांडले. 'या चित्रपटामधून खोटा प्रचार केला जात आहे', असंही त्यांनी म्हटलं.  


'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल शरद पवार म्हणाले, 'द काश्मिर फाईल्स  चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, तसेच या चित्रपटातून खोटा प्रचार केला जातोय. देशातील परिस्थिती सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढताना देखील दिसतोय.पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे.'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचं कौतुक केलं होते. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांनी देखील या चित्रपटाला पसंती दर्शवली. 


'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha