Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी
Alia Bhatt Film : ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी केली.
Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी केली.
चित्रपटात जसे कामाठीपुराचे चित्रण करण्यात आले आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. या ठिकाणी एकूण 42 गल्ल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 30 हजार लोक राहतात. तर, यातील फक्त 3 गल्ल्यांमध्ये सेक्स वर्कर राहतात.
कामाठीपुरा जवळपास 250 वर्ष जुना आहे. इथे अनेक इंजिनीअर, पायलट, डॉक्टर राहतात. पण, या चित्रपटामुळे ते नाहक बदनाम होतात, मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, इंटरव्ह्यूमध्येही मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो, असे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
कुटुंबीयांचा देखील चित्रपटाला विरोध!
गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी देखील या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या एका महिलेला या चित्रपटात केवळ कामाठीपुरातील एक व्यक्ती दाखवलं आहे.
गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनी 2021मध्येही या चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. याबद्दल बोलताना बाबू रावजी शाह म्हणाले की, 'माझ्या आईला एका वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये बसवण्यात आलं आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल काहीही बोलत आहेत.’
हेही वाचा :
- Project K : ‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी
- प्रेमात मिळाला मोठा धोका, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जिया खाननं घेतला जगाचा निरोप!
- कधी काळी रस्त्यावर चहा अन् लॉटरी तिकीट विकायचे अन्नू कपूर, ‘अंताक्षरी’ने अभिनेत्याला दिली खरी ओळख!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha