Vikram :  अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा विक्रम (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 200 कोटींची कमाई केली. विक्रम या चित्रपटामध्ये अभिनेता सूर्यानं ड्रग्स माफिया असणाऱ्या रोलेक्स नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. बुधवारी (8 जून) कमल हसन यांनी सूर्याला त्यांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच 'रोलेक्स' हे घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं. या घडाळ्याची किंमत 47 लाख रुपये आहे. 


सूर्यानं मानले आभार 
सूर्यानं ट्विटरवर पोस्ट शेअर करुन कमल हसन यांचे भेटवस्तू दिल्याबद्दल आभार मानले आहेत. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'हा खूप छान क्षण होता. थँक्यू आन्ना' सूर्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये कमल हसन हे सूर्याला घड्याळ घालताना दिसत आहेत. 


विक्रम चित्रपटामध्ये सूर्याचा 10 मिनीटांचा कॅमियो  
सूर्यानं विक्रम या चित्रपटामध्ये 10 मिनीटांचा कॅमियो रोल केला आहे. दहा मिनीटांचीच भूमिका असूनही सूर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन  लोकेश कनागराज यांनी केलं आहे. सूर्यानं या चित्रपटामध्ये ड्रग्स माफियाची भूमिका साकारली आहे. 
 





विक्रम हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम या भाषामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


संबंधित बातम्या