TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


‘मिस मार्वल’चा ग्रँड प्रीमिअर, मार्वल सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेताही झळकणार!


मार्वल स्टुडिओच्या बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिस मार्वल’चा आज ग्रँड प्रीमिअर होणार आहे. अभिनेत्री इमान वेलानी यात ‘कमला खान’च्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर मार्वल स्टुडिओच्या पहिल्या मुस्लिम सुपरहिरो सीरीज 'मिस मार्वल'मध्ये झळकणार आहे.


'सुजल-द वोर्टेक्स' 30 पेक्षा अधिक भाषेत होणार प्रदर्शित


'सुजल-द वोर्टेक्स' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. 'विक्रम वेधा' फेम पुष्कर आणि गायत्रीने या वेबसीरिजचे लेखन आणि निर्मिती केली आहे. ही वेबसीरिज आठ पेक्षा अधिक भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


ओटीटीवर दिसली ‘बाबा निराला’ची जादू, अवघ्या दोन दिवसांत पार केले 100 मिलियन व्ह्यूज!


एमएक्स प्लेयरच्या 'एक बदनाम-आश्रम' या वेब सीरीजचा तिसरा सीझन चांगलाच पसंत केला जात आहे. प्रेक्षकही ही सीरीज मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. आत बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ने एक मोठा विक्रम केला आहे. बॉबी देओल स्टारर या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनने ओटीटीच्या जगात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सीरीजचा तिसरा सीझन रिलीज होताच काही तासांतच व्ह्यूजचा विक्रम केला. ‘एक बदनाम-आश्रम 3’ला अवघ्या 32 तासांत 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.


अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण


देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेत्री सोनली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे. सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 


‘झोलझाल’ चित्रपटतून अभिनेता अमोल कागणे प्रेक्षकांच्या भेटीला


'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने 'बाबो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून, येत्या 1 जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पदार्पणातच एक ना अनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता, अभिनेता म्हणजे एक अजब रसायनच आहे. हा मेडिकलचा विद्यार्थी आपल्या फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसली.


जुही चावलाच्या चाहत्यांना 'गुड न्यूज'


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाचा चाहता वर्ग मोठा आहे. जुहीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी तिचा शर्माजी नमकीन हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आता ती एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुही 'फ्राईडे नाइट प्लॅन'  या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याबाबत जुहीनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 


अरुंधतीचं स्वप्न पूर्ण होणार; आशुतोषचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'आई कुठे काय करते' मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अरुंधतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं नवं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू आहे. 


‘जन गण मन’ चित्रपटासाठी पूजानं घेतले कोट्यवधींचे मानधन


अभिनेत्री पूजा हेगडेच्या 'राधे श्याम' या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती ‘जन गण मन’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा आणि पूजा हे एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी पूजानं आणि तिच्या स्टाफनं कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. 


 मोरे कुटुंब 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन


जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. खरतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं आहे. 12 जूनच्या महाएपिसोडमध्ये सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचा महादर्शन सोहळा अनुभवता येईल. 


'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से


बॉलिवडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल या दोघी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ये दिल्लगी, करण अर्जुन, डीडीएलजे, गुप्‍त, कभी खुशी कभी गम,  माय नेम इज खान आणि फना यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या काजोलला इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं असं तिनं कोण होणार करोडपतीमध्ये सांगितलं. अभिनय नाही तर एका ऑफिसमध्ये जाऊन नोकरी करायची इच्छा होती, असंही यावेळी काजोल म्हणाली.