एक्स्प्लोर

Jodi Marathi Movie: काळानं कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं...; बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट, पोस्टर पाहिलंत?

Jodi Marathi Movie: 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' या आशयाच्या टॅगलाइनसह 'जोडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jodi Marathi Movie: शेतकऱ्याच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीच्या कामात शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घालून, सजवून त्यांची पूजा केली जाते. शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ या परंपरेतून अधोरेखित होते. याच भावनिक नात्याला केंद्रस्थानी ठेवत पोळ्याचा मुहूर्त साधून एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' या आशयाच्या टॅगलाइनसह 'जोडी' (Jodi Upcoming Marathi Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फायनल ड्राफ्ट फिल्म प्रॉडक्शन आणि फेबलफॉक्स मीडिया प्रॉडक्शन यांच्या निर्मितीचा ‘जोडी’ हा चित्रपट ज्ञानेश्वर शांताराम जाधव यांनी लिहिला असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरने या कलाकृतीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जाताना दिसते. त्याच दृश्याच्या पार्श्वभूमीवर आकाश, शेतजमीन आणि आधुनिक शेतीचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर दिसत असल्याने बदलत्या काळाची झलकही पोस्टरमधून पाहायला मिळते.

Jodi Marathi Movie: काळानं कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं...; बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट, पोस्टर पाहिलंत?

पोस्टरवर 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' ही ओळ ठळकपणे झळकते. त्यामुळे बदलत्या शेतीपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या काळातही शेतकरी आणि बैलजोडी यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहणार असल्याचा आशय यातून सूचित होतो. चित्रपटातून बैलजोडी आणि त्यांच्या मालकाच्या नात्याचा वेगळा, भावस्पर्शी पैलू उलगडण्यात येणार आहे.

'एक नातं... एक परंपरा... आणि त्यामागची मनाला भिडणारी गोष्ट', अशी या चित्रपटाची संकल्पना असल्याचे पोस्टरवरून जाणवते. ऑगस्ट 2027 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन, शेती आणि माणूस-बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते मोठ्या पडद्यावर कसे रंगते, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
Pooja birari Yetech ata mi Nandayla: पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट
पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Devendra Fadnavis Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget