Jhund : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) या चित्रपटांनं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. नुकतीच झुंड चित्रपटाच्या टीमनं एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी नागराज मंजुळेनं चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंगचे भन्नाट किस्से सांगितले.
झुंड चित्रपटातील भावना भाभी ही भूमिका सायली पाटीलनं साकारली आहे. तिच्या कास्टिंगबाबत नागराजनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'सायली ही सैराटच्या ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी तिनं चांगल काम केलं पण तिची निवड झाली नाही. सायलीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. जेव्हा मी या चित्रपटातील भावना ही भूमिका लिहित होतो तेव्हा मला सायली ही भूमिका चांगली करेल असं वाटलं. मी या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी सायलीला फोन केला. तेव्हा तिला खरं वाटतं नव्हते की मी तिच्यासोबत बोलत आहे.'
सायलीनं सांगितलं, 'मी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पण तेव्हा सिलेक्ट नाही झाले. नंतर झुंडसाठी मला नागराज मंजुळे यांचा फोन आला तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की त्यांनी मला कॉल केला. ते म्हणाले की मी नागराज मंजुळे बोलतो. तेव्हा मी मनात म्हणाले, मग मी ऐश्वर्या राय बोलते. मला खरंच वाटतं नव्हतं की नागराज सरांनी मला फोन केला. मला वाटलं माझे मित्र माझ्यासोबत प्रॅन्क करत आहेत. नंतर मी नागराज सरांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यांना पाहून मी शॉक झाले होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. आता स्वत:ला या लेव्हलला पाहून छान वाटत आहे.'
हेही वाचा :
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha