All India Weather Update : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान वाढले आहे. त्याठिकाणी उन्हाळा सुरु झाला आहे. त्याचवेळी राजधानीतही होळीपूर्वी हवामानाचा मूड बदलू लागला आहे. दिल्लीसह अनेक राज्य थंडीला निरोप देत आहेत. हळूहळू सूर्यप्रकाश पडत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये सकाळी आणि रात्री थोडीशी थंडी जाणवत आहे. एकीकडे उत्तर भारतात दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असतानाच डोंगराळ भागात मात्र, रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळं दिवसभर थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. तर काही जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे.


महाराष्ट्रासह केरळ आणि काही राज्यात येत्या दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लडाख आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वेस्टर्न डिस्टर्बन्स कायम आहे. ज्याचा परिणाम आजूबाजूच्या राज्यांमध्ये दिसून येईल. हा विळखा हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. या कारणामुळे पंजाब, हरियाणा, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


एकीकडे उत्तर भारतात दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असताना, डोंगराळ भागात रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे दिवसभर थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पुढील 4 दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढू शकते. तर वायव्य भारतातील बहुतांश भागात कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पाटणा, बिहारमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असू शकते. दुसरीकडे, लेहमध्ये अजूनही थंडी पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लेहचे किमान तापमान उणे 3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. तर जम्मूचे किमान तापमान 12 अंश आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील.


महत्त्वाच्या बातम्या: