Janhavi Killekar Comment On Trollers: कोल्हापुरात बिस्लरी पाण्याने अंघोळ केल्याचं सांगताच जान्हवी किल्लेेकर ट्रोल, दोनच शब्दाची कमेंट करत प्रत्युत्तर, म्हणाली...
'सायको रंगा' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जान्हवी सोबत स्मिता गोंदकर, सुबोध भावे, पुष्कर जोग, मिलिंद शिंदे अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.

Janhavi Killekar: सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत 'सायको रंगा' या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरही (Janhavi Killekar) दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे. नुकताच तिने सिनेमातील शूटिंग दरम्यान कोल्हापुरात आलेला अनुभव शेअर केला. कोल्हापुरात शूटिंगच्या काळात त्वचा संवेदनशील असल्यामुळे ती बिस्लरी पाण्याने अंघोळ करत असल्याचं जान्हवी म्हणाली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. जान्हवीने तिच्या बेधडक अंदाजात आता ट्रॉलर्सला दोन शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ट्रॉलर्सला केलेल्या कमेंट्समुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नेमकं काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?
'बिग बॉस मराठी'मध्ये आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या 'सायको रंगा' या मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असली तरी शूटिंग होऊन परतल्यानंतर कोल्हापुरातले काही अनुभवतीने अलीकडेच शेअर केले. ती म्हणाली,
"कोल्हापूरला शुटिंगचं ठरलं... मला कोल्हापूर ऐकल्यावर खरंच थोडं टेन्शन आलेलं... कारण मला स्किन प्रॉब्लेम्स खूप आहेत, मी बाहेर कुठे गेले की, मला तिथलं वातावरण सूट होत नाही, मग कोल्हापूरचं पाणी वैगरे, कारण मुंबईच्या पाण्याची सवय झालीय, मग कसं मॅनेज करायचं, किती अॅडजस्टमेंट्स कराव्या लागतील... वैगरे वैगरे... तुला सांगू मी अंघोळ बिस्लेरीच्या पाण्यानं करायचे. कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे, पण स्क्रिन आपली वाईट आहे तर काय करणार? ते माझं माझं पर्सनल खर्चानं करायचे, माझ्या स्वतःसाठी होतं ना, ते प्रोडक्शनला का द्यायचं?", असंही जान्हवीनं सांगितलं.
ट्रॉलर्सला जान्हवी किल्लेकरचे प्रत्युत्तर
जान्हवी किल्लेकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने तिला ट्रॉल करायला सुरुवात केली. ' काहींनी मुंबईचे पाणी कोल्हापूरच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे का मॅडम? असा सवाल केला. तर काहींनी म्हटलं ' म्हणजे तुम्हाला स्वच्छ पाण्याचे ऍलर्जी आहे. ट्रोल कमेंट्स वाढत असल्याचं लक्षात येताच जान्हवीने दोनच शब्दात ट्रॉलर्सला प्रत्युत्तर दिला आहे.

तिने कमेंट करत म्हटलं' ट्रॉलर्स वेलकम' .. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रॉलिंगला जान्हवी कायम तिच्या बेधडक अंदाजात प्रतिउत्तर देताना दिसते. दरम्यान 'सायको रंगा' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जान्हवी सोबत स्मिता गोंदकर, सुबोध भावे, पुष्कर जोग, मिलिंद शिंदे अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.





















