एक्स्प्लोर

चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: घटस्थापनेच्या निमित्ताने स्वामी या चौघींना एकत्र आणतात आणि त्यांना त्यांच्या जन्मनावांनी हाक मारत त्यांच्या मूळ अस्तित्वाची जाणीव करून देतात.

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) मालिकेत स्वामींच्या दिव्य अनुभूतीतून समोर येणार चार स्त्रिया आणि साडेतीन शक्तिपीठांमधील अकल्पित नातं! नवरात्रीचा पवित्र सोहळा, आदिशक्तीचा गजर आणि स्वामींच्या दिव्य लीला… यंदा स्वामी स्थानात घडणारं काहीतरी विलक्षण प्रेक्षकांना थक्क करणार आहे. शांभवी, मधुवंती, रुही आणि चिमुरडी तेजस्वी या चौघींना स्वामी एका वेगळ्याच शक्तीची जाणीव करून देणार आहेत. या चौघींचं एकत्र येणं, घटस्थापनेच्या वेळी त्यांच्या हातून चौरंगावर सांडलेलं कुंकू आणि त्यांच्या हातातील दिवट्यांनी घेतलेला दैवी पेट… हे केवळ चमत्कार आहेत की एका मोठ्या परिवर्तनाची नांदी? स्वामींच्या प्रत्येक कृतीमागचं गूढ आता उलगडणार आहे.स्वामींच्या या घटस्थापनेत यंदा स्त्री शक्तीचा अनोखा जागर पाहायला मिळणार असून, यामागचा आध्यात्मिक अर्थ भक्तांना मंत्रमुग्ध करणारा ठरणार आहे.  

घटस्थापनेच्या निमित्ताने स्वामी या चौघींना एकत्र आणतात आणि त्यांना त्यांच्या जन्मनावांनी हाक मारत त्यांच्या मूळ अस्तित्वाची जाणीव करून देतात. मात्र, स्वामींचा हेतू केवळ त्यांना एकत्र आणण्यापुरता मर्यादित नाही. त्यांच्या मनात धगधगणारा अन्यायाविरुद्धचा संताप आणि त्यांच्यात दडलेली स्त्रीशक्ती जागृत करण्याचा स्वामींचा संकल्प आहे.दुसरीकडे, स्त्रियांवर अनेक अत्याचार करणाऱ्या - रणजीतच्या आयुष्यात अनाकलनीय आणि भीतीदायक घटनांचे सत्र सुरूच आहे. रणजीतला सतत रणशिंग फुंकल्याचे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येत आहेत. मार्तंड आणि संपतच्या सल्ल्यानुसार रणजीतने स्वामींविरुद्ध युद्धाचे आव्हान जरी स्वीकारले असले, तरी घराच्या पायऱ्यांवर कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी न निघणारे कुंकू आणि घडणारे रहस्यमय प्रकार त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना काळजीत पाडत आहेत. रणशिंग फुंकलं गेलं आहे आणि एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. 

चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?

याच प्रवासात स्वामी साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व उलगडताना या चौघींचा आणि महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांचा एक अद्भुत संबंध प्रस्थापित करतात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी… या चार शक्तिस्वरूपांच्या दर्शनातून स्वामी चौघींच्या परड्यांमध्ये दैवी संकेत प्रकट करतात. काय असतील ते संकेत आणि त्याचे महत्व?

चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?

स्वामींच्या या दिव्य अनुभूतीतून शांभवी, मधुवंती, रुही आणि तेजस्वी यांचं साडेतीन शक्तिपीठांशी असलेलं नातं उलगडत जातं. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो, ही केवळ श्रद्धा नसून तिच्यातील अन्यायाविरुद्ध लढण्याच्या सामर्थ्याची जाणीव आहे, हे स्वामी आपल्या कृतीतून अधोरेखित करतात. आणि अखेर स्वामी एक असा उलगडा करतात, जो या संपूर्ण कथेला नवं वळण देतो. 

चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?

या चौघी केवळ चार स्त्रिया नाहीत, तर साक्षात साडेतीन शक्तिपीठांचं प्रतीक आहेत, असं स्वामी का सांगतात? आणि या दिव्य शक्तीच्या जागरातून ह्या चौघींच्या हातून रणजीतरूपी महिषासुराचा विनाश कसा होणार? बघूया रणजीतचं सत्य आणि त्याचा खरा चेहरा समोर कसा आणणार ? स्वामी ह्या चौघींची मदत कशी करणार ? नऊ देवींचा जागर, स्वामी लीलेचा साक्षात्कार... स्त्रीशक्तीच्या हुंकाराने होणार, महिषासुराचा संहार! न्यायासाठी पेटलेली ठिणगी, श्रद्धेचा दिव्य प्रकाश आणि स्त्रीशक्तीच्या जागराचा थरारक प्रवास अनुभवण्यासाठी नक्की पहा जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा'. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Vijay Viral Video : अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Neha Gadre : दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Embed widget