Baipan Bhaari Deva : सध्या बॉक्स ऑफिसवर स्रियांच्या मुद्द्यावर भाष्य करणारे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांनी सुरुवातीचपासून प्रेक्षकांच्या मनावर तसेच बॉक्स ऑफिसवरही राज्य केलं.  मराठीत काही दिवसांपूर्वी आलेले झिम्मा 2, बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva)ते बॉलीवूडचे क्विन, मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, मर्दानी 2 या चित्रपटांची पर्वणी महिला प्रेक्षकांना होणार आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने  हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याचसाठी महिलांना केंद्रीत करणारे हे चित्रपट सिनेमागृहात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. झिम्मा 2 आणि बाईपण भारी देवा हे चित्रपट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले. या चित्रपटांवर प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम केलं. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'बाईपण भारी देवा'


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Guppe), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. 






झिम्मा -2 ने पुन्हा गाजवलं बॉक्स ऑफिस 


हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामधून सुहास जोशी (Suhas Joshi), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग (Kshiti Jog), सोनाला कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सायली संजीव (Sayali Sanjeev), मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole) ही तगडी स्टारकास्ट भेटीला आली होती. या प्रवासामध्ये या महिलांनी केलेली मज्जा आणि त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या गोष्टी प्रेक्षकांना भावल्या. त्यानंतर प्रेक्षकांना 'झिम्मा 2' (Jhimma 2) ची उत्सुकता होती. या देखील सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या भागामध्ये शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) झळकल्या होत्या. 






बॉलीवूडच्या चित्रपटांची देखील होणार पर्वणी 


कंगना राणौतचा (Kangana Ranaut)'क्विन' (Queen) हा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली होती. नव्या देशात जेव्हा एखादी महिला तिच्या अस्तित्वासाठी झटते त्यावेळी तिने केलेला प्रवास प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला. आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येणार आहे. त्याचप्रमाणे राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुख्य भूमिकेत असलेला मर्दानी 2 (Mardani 2) हा देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील राणी मुखर्जीच्या डॉयलॉगने विशेष करुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तसेच राणी मुखर्जीची मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 










ही बातमी वाचा : 


Zee Gaurav Chitra Puraskar 2024 : खरंच बाईपण भारी! तब्बल सहाजणींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणाल्या...