Horoscope Today 8th March 2024 Cancer Leo Virgo : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 7 मार्च 2024  हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 


कर्क- (Cancer Today Horoscope)


नोकरी (Job) - दिवस खूप चांगला जाणार आहे. जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या ऑफिसमधील तुमचे सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.


व्यवसाय (Business) -  तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमचा भागीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल.  


तरुण (Youth)-  आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आपल्या आहारात समतोल राखा आणि विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर यश मिळविण्यासाठी त्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागेल.  रेंगाळलेली सर्व कामे  पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन समाधानी राहील.


 आरोग्य (Health) - आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, तिची प्रकृती बिघडू शकते. शिवरात्रीला रुद्राभिषेक करू शकता. तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि तुम्हाला आजारांपासून लवकर आराम मिळेल. 


सिंह (Leo Today Horoscope)  


नोकरी (Job) -  दिवस चांगला जाईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील.  ते तुमची बढतीही करू शकतात.


व्यवसाय (Business) - व्यवसायात पैसे गुंतवलेत तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. उद्या तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी मोठा निर्णय घेऊ शकता


तरुण (Youth)-  समाजाच्या भल्यासाठी काम केले तर समाजात तुमचा सन्मान खूप वाढू शकतो. तुमची एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते, भांडणाच्या वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.  


 आरोग्य (Health) - जोडीदाराच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता. शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शिवलिंगाला भांग किंवा धोतऱ्याचे फूल अर्पण करावे. तुमचे आरोग्य लवकरच सुधारेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सकाळी थोडा व्यायाम करा.


कन्या (Virgo Today Horoscope)    


नोकरी (Job) - काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर  तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या.  मन शांत ठेवा, कशाचीही चिंता करू नका, अन्यथा तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो.


व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमच्या जोडीदाराकडून तुमची फसवणूक होऊ शकते.


 आरोग्य (Health) - आरोग्य चांगले राहील. जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल तर तुमची औषधे वेळेवर घेत राहा. शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करून फक्त फळे खावीत, शिवलिंगाला दूध व गंगाजल अर्पण करावे. तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :