Horoscope Today 8th March 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....


तूळ (Libra Today Horoscope)


नोकरी (Job) -  दिवस चढ-उताराचा असेल. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला व्यवसायात काही मोठा नफा मिळू शकतो. 


व्यवसाय (Business) - व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जुन्या सहकाऱ्याची मदत घ्यावी लागेल. शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्या व्यापाऱ्यांना नफा मिळू शकतो.  


 आरोग्य (Health) - आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखा, तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही खूप काळजी करू शकता. शिवरात्रीच्या दिवशी कुटुंबासोबत रुद्राभिषेक केल्यास कुटुंबात शांती नांदेल, सुख-समृद्धी येईल आणि शरीर निरोगी राहील.


वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  


नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर  कामाच्या अतिरेकीमुळे तुम्हाला  थकवा जाणवू शकतो. ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.


व्यवसाय (Business) - व्यवसायाशी संबंधित काही काम अडकले असेल तर ते  पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि तुम्हाला नफा मिळू शकतो. 


कुटुंब (Family) - कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता. त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि त्यांच्यासोबत बसून तुम्ही जुन्या आठवणी ताज्या करू शकता. 


 आरोग्य (Health) - आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाला भांग, धोतऱ्याची फुले अर्पण करावीत.


धनु (Sagittarius Today Horoscope) 


नोकरी (Job) - तुमच्या ऑफिसमधील काही कामांमुळे तुम्ही खूप तणावाखाली असाल, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध राहा, ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.


व्यवसाय (Business) -  व्यवसायातही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे पूर्ण ठेवावीत.


तरुण (Youth) - करिअरकडे लक्ष द्यावे आणि चुकीच्या मित्रांची संगत टाळावी.


 आरोग्य (Health) - कुटुंबातील सदस्याची प्रकृतीही बिघडू शकते. त्याची विशेष काळजी घ्यावी. शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन दूध आणि गंगाजल अर्पण करा, दिवसभर उपवास ठेवा आणि फळे खा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :