Zee Gaurav Chitra Puraskar 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री अथवा कलाकृती म्हणून एकाच पुरस्कार सोहळ्यात कितीजणांना पुरस्कार मिळू शकतो? एक, दोन किंवा फार तर तीन जणांना पुरस्कार मिळू शकतो. मात्र, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा सहा अभिनेत्रींना मिळाला. मंगळवारी रात्री 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा पार पडला. त्यावेळी 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने (Baipan Bhaari Deva) पुरस्कारांची लयलूट केली. या चित्रपटातील सहाही अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.अभिनेत्री सुकन्या कुलकर्णीने खास पोस्ट लिहिली आहे. 


'बाईपण भारी देवा'  चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukanya Mone Kulkarni) , दीपा परब (Deepa Parab), वंदना गुप्ते (Vandana Gupte), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. सहा बहिणींचे नाते आणि त्यांच्याशी संबंधित भावनिक विश्वावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. पहिल्यांदाच सहा अभिनेत्रींना एकाच वेळी एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. त्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 


या पुरस्कारानंतर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  र्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार.... झी गौरव.... आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार... झी गौरव... ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ' बाईपण भारी देवा! ' ला. असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत.... कायम असे म्हणत खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवलं, असे सुकन्या मोने यांनी म्हटले. 






बॉक्स ऑफिसवर ठरला यशस्वी 


'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला. महिलांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले. 


 इतर संबंधित बातमी :