एक्स्प्लोर

Prasad Vedpathak White Line Controversy: जैनांच्या 'पांढऱ्या पट्टी'चा वाद आणखी चिघळला; धमक्यांनंतर प्रसाद वेदपाठकचा मोठा निर्णय, थेट मनसे दरबारी जाणार

Content Creator Prasad Vedpathak: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक घेणार मनसे नेत्यांची भेट, जैन समाजाच्यावतीनं करण्यात येणाऱ्या रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात उठवला होता आवाज.

Prasad Vedpathak Meets MNS Leaders: सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यानं जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (Jain White Strip) मुद्दा उचलून धरला होता. त्यानं सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करुन विरोध दर्शवला होता. त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीच्या बाहेर पांढरी पट्टी मारण्यात आली होती. सोसायटीतील सदस्यांशी चर्चा न करता, बिल्डिंगच्या आवारात पांढरी पट्टी मारण्यात आलीच कशी?  असा सवाल (Entertainment) त्यानं आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला होता. वाद वाढल्यानंतर त्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. 

काही दिवसांपूर्वी या प्रकरणात भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी जैन समुदायाचे नेतृत्व करत प्रसाद  वेदपाठकच्या भूमिकेचा विरोध केला होता. यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत प्रसाद थेट मनसे पक्षाकडे मदतीसाठी धावला. त्यानं अलिकडेच मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली होती.  तसेच ट्विट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानं आपल्या ट्विटमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं.  त्याचं हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. 

प्रसाद वेदपाठक घेणार मनसे नेत्यांची भेट (Prasad Vedpathak Will Meet MNS Leader Today)

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या संबंधित आज प्रसाद वेदपाठक मनसे नेते  संदीप देशपांडे  आणि अविनाश जाधव यांची दुपारी 12 वाजता भेट घेणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेला मनसे पक्षाकडून पाठिंबा मिळणार असून, त्याच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळणार की निवळणार? हे येत्या काळात समोर येईल. दरम्यान, या भेटीनंतर मनसे नेते या प्रकरणी नेमकी कोणती अॅक्शन घेणार? प्रसाद वेदपाठकला नेमकं कुणाकडून धमक्या येत आहेत?  हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 

पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका आहे तरी काय? (Prasad Vedpathak Controversy)

कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठकनं जैन धर्मगुरुंसाठी घाटकोपरमधील 'कैलास अव्हेन्यू' सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला होता.  प्रसादच्या म्हणण्यानुसार,  सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता त्यांनी ही पांढरी पट्टी मारली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यानं आपल्या व्हिडीओतून केला.  प्रसादनं या प्रकरणाच्या विरोधात  आवाज उठवला. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून याची माहिती दिली.  वाढत्या वादानंतर ती पांढरी पट्टी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं ट्विट केलं होतं.  हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की,  थेट मनसे दरबारीपर्यंत पोहोचलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुन्हा एकदा 14 जून, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताचं काय कनेक्शन? चुलत भावानं इंस्टा अकाऊंटही सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Natak Mukkam Post Pandharpur: पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget