Orry Viral Video : कधी बॉलीवूड सेलिब्रेटींसोबत,कधी कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसायला दिल्याबद्दल अशा अनेक कारणांमुळे सध्या एक व्यक्ती बरीच चर्चेत आहे. पण आता हीच व्यक्ती कायद्याच्या रिंगणामुळे चर्चेत आल्याची माहिती समोर येतेय. प्रत्येक कार्यक्रमात हल्ली फोकस हा ओरीकडे (Orry) असतो. पण याच ओरीवर एका कंटेट क्रिएटरने (Content Creator) आरोप केलेत. त्यानंतर या कंटेट क्रिएटरच्या विरोधात ओरीने कायदेशीर नोटीस जारी केली आहे.
ओरीने कंटेंट क्रिएटर रुचिका लोहिया हिच्या विरुद्ध तक्रार केली आहे. रुचिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ओरीवरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर ओरीने तिच्या त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देखील दिलंय. त्यामुळे सध्या ओरीने या सगळ्यामुळे चर्चेत आलाय. हा व्हिडिओ मिलियन्स लोकांनी पाहिली असून यावर लाखो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
कंटेंट क्रिएटर रुचिकाने ओरीवर काही आरोप केले आहेत. भर कार्यक्रमात ओरीने तिला हात मिळवण्यास नकार दिला असं रुचिकानं म्हटलं आहे. यावर तिने एक व्हिडिओ देखील केलाय. तिचा हा व्हिडिओ जवळपास मिलियन्स लोकांनी पाहिला. पण यावर ओरीने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. तिच्या याच व्हिडिओवर ओरीने कमेंट करत त्याचं स्पष्टीकरण दिलं. पण यामध्ये ओरीने ती तिच्या व्हिडिओवरील कमेंट डिलीट करत असल्याचंही ओरीने म्हटलं आहे.
कमेंटसेक्शनमधून आरोचं स्पष्टीकरण
ओरीने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'तुझ्या हातावर कोणते जंतू आणि घाण आहेत हे मला माहीत नाही म्हणून हात मिळवण्यास नकार दिला. मला वेळ मिळेल तेव्हा चाहत्यांना आणि मित्रांना भेटून मला नेहमीच आनंद होतो. या कार्यक्रमात तू मला भेटण्यासाठी अनेकांना धक्का दिलास, माझी सुरक्षा पाहिली नाहीस, माझ्या मॅनेजरचा अनादर केला, पण तरीही मी नम्रपणे तुझ्याशी बोललो. पण तू अशी अपेक्षा नाही ठेवू शकत की एखादी अनोळखी व्यक्ती तुझ्याशी हात मिळवेल. यानंतर ओरीने तिच्या विरोधात कायदेशीर नोटीस जारी केली आहे. तसेच मी तुझ्याविरोधात मानहानीचा दावा करेन असा दम देखील आरीने तिला यावेळी दिला आहे.