नुसरत जहाँच्या आरोपांवर अखेर पती निखिल जैननं सोडलं मौन
मागील काही काळापासून नुसरत जहाँ खासगी आयुष्यातील काही घडामोडींमुळे चर्चेत आहेत.
कोलकाता : बंगाली अभिनेत्री आणि त्यानंतर राजकारणाकडे वळलेल्या तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचं नाव मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वैवाहिक आयुष्य आणि गरोदरपणाच्या चर्चांमुळं त्यांचं नाव प्रकाशझोतात आलं आहे. 2020 मध्येच नुसरत आणि त्यांचा पती निखिल जैन यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याची माहिती समोर आली होती.
पतीवर अनेक गंभीर आरोप करत नुसरत जहाँ यांनी त्यांचा विवाहच अमान्य ठरवला होता. त्यांच्यामागोमाग आता निखिल जैन यांच्यामार्फतही अनेक खुलासे करण्यात आले आहेत. ज्यामध्ये त्यांनी नुसरत जहाँ यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केल्याचं कळत आहे. आम्ही पती- पत्नी म्हणूनच एकमेकांसोबत राहत होतो, नुसरत यांच्या जवळच्या व्यक्तींनाही ठाऊक आहे की मी त्यांच्यासाठी खुप काही केलं आहे, ही बाब निखिलनं सर्वांसमोर आणली.
Sonu Sood with Fan : सोनू सूदचा जबरा फॅन! हैदराबादहून पायी निघालेला चाहता अखेर मुंबईत दाखल
मी या वैवाहिक नात्यासाठी भरपूर गोष्टी खर्ची घातल्या- निखिल
हल्ली केलेल्या वक्तव्यामध्ये नुसरत यांच्या पतीनं सांगितल्यानुसार, प्रेम नसतानाही त्यांनी नुसरत यांना प्रपोज केलं होतं. नुसरत यांनीही मोठ्या मनानं त्यांचा स्वीकार केला होता. ज्यानंतर ते दोघं डेस्टिनेशन वेडिंगसाठी टर्की येथे गेले होते. 2019 मध्ये कोलकाता येथे त्यांच्या लग्नाचं रिसेप्नशनही देण्यात आलं होतं.
एक पती म्हणून आपण या नात्यामध्ये खूप गोष्टी खर्चल्या होत्या. पण, लग्नानंतर मात्र नुसरत यांचं वागणं बदलू लागलं असंही निखिल यांनी स्पष्ट केलं. मागील वर्षभरापासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या नुसरत यांच्या वागण्यात बदल होऊ लागले. निखल यांनी वारंवार सांगूनही या लग्नाची नोंदणी करण्यात आली नाही.
नुसरतनं मला बोलायला भाग पाडलं…
नुसरत जहाँ यांच्या पतीनं दिलेल्या माहितीनुसार आपल्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळेच आज आपल्याला या सर्व गोष्टी बोलाव्या लागत आहेत. नुसरत यांना गृहकर्जातून मुक्त करण्यासाठी निखिल यांनी कुटुंबाच्या खात्यातून मोठी रक्कम दिली होती. पण, ती रक्कम आजतागायत त्यांना परत मिळालेली नाही. आपल्यावर नुसरत यांनी लावलले सर्व आरोप चुकीचे असून, याचा पुरावा म्हणून माझ्याकडे बँक स्टेटमेंटही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या कुटुंबानं नुसरतला कायमच मुलीचा दर्जा दिला पण, हा दिवस पाहायला मिळेल अशी कल्पनाही नव्हती असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात आलेलं वादळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पतीनं आपल्या खात्यातून बेकायदेशीररित्या पैसे काढल्याचं म्हणज लग्नाच्या वेळी नातेवाईकांनी आपल्याला दिलेले दागिनेही हिरावून घेतल्याचा आरोप जहाँ यांनी केला होता.