एक्स्प्लोर

पुष्कर जोगचा नवा सायकोलॉजिकल थ्रिलर येतोय प्रेक्षकांच्या भेटीस, थरारक कथेसह तगड्या स्टारकास्टची एकच चर्चा

बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप ठरलेला पुष्कर, 'व्हिक्टोरिया – एक रहस्य'च्या यशानंतर आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गडद विषयावर झळकणार आहे.

Marathi Thriller Movie: भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच अशा विषयांवर चित्रपट तयार होतात, जे वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा पूर्णपणे मिटवतात. लवकरच प्रेक्षकांसमोर येत असलेला ‘ह्युमन कोकेन’ हा तसाच एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या, भयानक आणि अनाकलनीय जगात घेऊन जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा एका तीव्र, आव्हानात्मक आणि भावनिक भूमिकेत दिसणार आहे. 'जबरदस्त' या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारा आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप ठरलेला पुष्कर, 'व्हिक्टोरिया – एक रहस्य'च्या यशानंतर आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गडद विषयावर झळकणार आहे.

सायकोलॉजिकल थ्रिलरविषयी काय म्हणाला पुष्कर?

पुष्करने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं, “‘ह्युमन कोकेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रोजेक्ट आहे. या पात्रासाठी मी अनेक वर्कशॉप्स केल्या, कारण एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या माणसाच्या मनोवस्थेचं वास्तव दाखवणं सोपं नव्हतं. हा अनुभव थरारक आणि भावनिक दोन्ही होता.”

दमदार स्टारकास्ट

चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची दमदार स्टारकास्ट आहे. त्यामुळे या चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय लुक प्राप्त झाला आहे. दिग्दर्शक सरीम मोमिन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, आणि टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गूजबंप्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली आहे.

ची तेंग जू आणि हरीत देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, संगीत क्षितिज तारे, आणि नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी व खालिद शेख यांनी केलं आहे.

कधी होणार प्रदर्शित?

‘ह्युमन कोकेन’चं चित्रीकरण युनायटेड किंगडममध्ये करण्यात आलं असून हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून समाजातील काळ्या बाजूचं धक्कादायक प्रतिबिंब आहे. मानवी तस्करी आणि ड्रग सिंडिकेटच्या वास्तवावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरण्याची शक्यता आहे.‘ह्युमन कोकेन’ हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या वर्षातील सर्वात चर्चित आणि धाडसी मराठी थ्रिलर ठरेल, अशी अपेक्षा सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
Monalisa Muslim Husband Farman Khan:
"आम्ही धर्म बदललेला नाही, हे 'लव जिहाद' नाही"; मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget