एक्स्प्लोर

Hrithik-Saba Wedding : हृतिक रोशनच्या घरी लवकरच ऐकू येणार सनईचे सूर! मित्राकडून अभिनेत्याच्या लग्नाचे संकेत!

Hrithik-Saba Wedding : काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, त्याविषयी सबाने एक पोस्ट शेअर केली होती.

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, त्याविषयी सबाने एक पोस्ट शेअर केली होती.

सबा आणि हृतिकची माजी पत्नी सुझानचीही चांगली बॉन्डिंग होती. आता, दोघांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांना हवा मिळाली आहे. मात्र, दोघांनीही या गुप्त नात्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आता हृतिकच्या मित्राने दोघांच्या लग्नासंदर्भात खुलासा केला आहे. 

मित्राने केला खुलासा!

हृतिक आणि सबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, ‘दोघेही एकमेकांना आवडतात. हृतिकच्या कुटुंबाला सबा खूप आवडते. हृतिकप्रमाणेच, कुटुंबाला सबाचे संगीत क्षेत्रातील काम आवडते. नुकतीच सबा घरी आली तेव्हा तिने कुटुंबासोबत म्युझिक सेशन केले. हृतिक आणि सबा एकत्र आहेत, पण त्यांना रिलेशनशिपमध्ये अजिबात घाई करायची नाही. अजून लग्नाचा निर्णय घ्यायला वेळ असेल.’

हृतिक रोशन आणि सबा आझाद एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर भेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली. बीटीच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशन आणि सबा गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

अशी झाली सुरुवात!

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये सबा आणि एक रॅपर होते, तेव्हापासून त्यांची मैत्री सुरू झाली. सबाने हृतिकचे कौतुक केल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि त्यानंतर डीएमच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

सबा आझाद शेवट सोनी लिव्ह वेब सीरीज 'रॉकेट बॉईज' मध्ये दिसली होती. या शोमध्ये तो परवाना इराणीच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत जिम सरभ आणि इश्वाक सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. दुसरीकडे हृतिक रोशन त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mandar Tillu Passes Away: मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Ashok Saraf Video: डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
बहिण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहिण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Embed widget