इंटिमसी अन् कंडोम; भरकार्यक्रमात Gen Zसमोर हनी सिंह काय म्हणाला? VIDEO व्हायरल होताच मागितली माफी
Honey Singh Faces Backlash for Abusive Language: दिल्लीतील संगीत कार्यक्रमातील व्हिडिओमुळे हनी सिंह वादात. अपशब्द वापरल्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग.

Honey Singh Faces Backlash for Abusive Language: गायक आणि रॅपर हनी सिंह गाणी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. बऱ्याचदा तो वादातही अडकला होता. दरम्यान, अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिल्लीतील एका संगीत कार्यक्रमादरम्यान त्यानं अपशब्दाचा वापर केला. त्यानं भर कार्यक्रमात इंटीमेसी आणि कंडोमबद्दल चर्चा केली. दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात अपशब्दांचा वापर केल्याबद्दल हनी सिंह प्रचंड ट्रोल झाला. ट्रोल झाल्यानंतर हनी सिंग याने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच सर्वांची माफी मागितली. या प्रकरणानंतर त्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.
हनी सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो माफी मागताना दिसत आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा'. व्हिडिओमध्ये हनी सिंह म्हणतो, "मी फक्त तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी आलो आहे. आज सकाळपासून माझा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जो अनेकांनी एडिट केला आहे. अनेकांना हा व्हिडिओ आक्षेपार्ह वाटत आहे. या व्हिडिओमागची खरी माहिती, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे", असं हनी सिंह म्हणाला.
व्हिडिओमागचं सत्य हनी सिंहने उघड केलं
हनी सिंह म्हणतो, "मी नंदकोर करूणच्या शोमध्ये फक्त पाहुणा म्हणून उपस्थित होतो. शोमध्ये जाण्यापूर्वी सुमारे दोन दिवस आधी, मी काही स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लैंगिक तज्ज्ञांसोबत जेवण केले. ते माझ्याशी चर्चा करत होते. त्यांनी मला सांगितले की, आजकाल तरूण पिढी लैंगिक आजाराने त्रस्त आहे. बरेच लोक असुरक्षित लैंगिक संबंध ठेवत आहे. जेव्हा मी शोमध्ये गेलो, तेव्हा जनरेशन झेड प्रेक्षकांची मी गर्दी पाहिली. मला तेव्हा असे वाटले की, त्यांना त्यांच्याच भाषेत संदेश द्यावा. असुरक्षित संबंध ठेवू नका, कंडोमचा वापर करा", असं हनी सिंह म्हणाला.
'माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता'
हनी सिंह म्हणतो की, "मला वाटलं होतं की, मी तरूणांशी ओटीटी भाषेत बोलेन. ते या भाषेत अधिक चांगलं समजतील. पण अनेकांना ही भाषा आक्षेपार्ह वाटली. पण मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मी अशी चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेन", असं हनी सिंहनं व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं.
























