एक्स्प्लोर

मराठी नाट्य निर्माता संघाकडून रंगमंच कामगार, व्यवस्थापक आणि बुकिंग क्लार्क यांना आर्थिक मदत

मराठी नाट्य निर्माता संघाकडून रंगमंच कामगार, व्यवस्थापक आणि बुकिंग क्लार्क यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

'कोरोना-लॉकडाउन'ची प्रक्रिया सुरू झाली, त्याच वेळेस "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई'च्या कार्यकारिणीच्या बैठकीत (19 मार्च) अडचणींचा विचार करून "रंगमंच कामगार संघटना'ला व नाट्य व्यवस्थापक संघटना तसेच बुकिंग क्लार्क यांना अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही तांत्रिक पुर्ततेअभावी संस्थेचे बँक खाते स्थगित होते. परिणामी, अर्थसहाय्य निर्णयाची कार्यवाही होऊ शकली नाही.

दरम्यान, "रंगमच कामगार संघटने"ने आपल्या संस्था सदस्यांची संख्या अधिक असल्याने अधिक अर्थ सहाय्याची लेखी कार्यकारिणीच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहून केली होती. त्यावर पूर्वीप्रमाणे विद्यमान कार्यकारिणीतही सकारात्मक चर्चा होऊन आणि 'न्यासाच्या व बँकेच्या कागदपत्रांची पुर्तता होताच तातडीने हे अर्थ सहाय्याचे धनादेश काढावे,' असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार, संस्थेचे बँक खाते आता कामकाजासाठी खुले होताच, वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊनंतरच्या नव्या वर्षात पहिल्या मराठी सिनेमाची तारीख जाहीर

यासाठी 'मराठी रंगभूमी दिनाचे (5 नोव्हेंबर) औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर, माटुंगा येथे 'नाट्य निर्माता संघा'चे अध्यक्ष संतोष काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, वरील 'रंगमच कामगार संघ' आणि 'नाट्य व्यवस्थापक संघ', पदाधिकारी तसेच बुकिंग क्लार्क यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमाला 'अ.भा. मराठी नाट्य परिषद'चे अध्यक्ष प्रसाद कांबळी, उपाध्यक्ष नाथाभाऊ चितळे, ज्येष्ठ नाट्य निर्माते अशोक हांडे, संतोष कोचरेकर, ज्येष्ठ कलावंत राजन भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते 'रंगमंच कामगार संघा'चे अध्यक्ष किरण वेल्हे, 'नाट्य व्यवस्थापक संघा'चे प्रमुख कार्यवाह हरिभाऊ पाटणकर, नितीन नाईक, छोटू आजगांवकर यांच्याकडे अर्थसहाय्यचे चेक सुपूर्द करण्यात आले.

हे अर्थसहाय्य पुढिलप्रमाणे देण्यात आले

  • "रंगमंच कामगार संघ" 5 लाख रुपये.
  • "अ भा मराठी नाट्य परिषद"ने रंगमच कामगारांना लॉकडाउन काळात, अर्थसहाय्य देण्यासाठी 'रंगकर्मी मदत निधी'ची निर्मिती केली आहे. या कार्याला 5 लाख रुपये.
  • नाट्य व्यवस्थापक संघाला आणि बुकिंग क्लार्क यांना एकत्रित असे 1लाख रुपये.

"रंगमंच कामगार हा नाट्य व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांना अर्थसहाय्य देण्यास उशीर झाला तरी दिवाळीच्या आधी त्यांच्या हाती रक्कम पोहोच व्हावी, अशी भावना 'नाट्य निर्माता संघ'ची आहे,' असे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. सर्व मान्यवरांचेही मार्गदर्शन होते. 'नाट्यगृहे शासनाने नाट्य प्रयोगांसाठी खुली केली तरी, नाट्य व्यवसाय पुर्ववत उभा राहाण्यासाठी नाट्य निर्मात्याला शासकीय अर्थ सहाय्याची आवश्यकता कशी आहे? त्याबाबत शासनाने आपली भुमिका जाहीर करावी,' अशी मागणी प्रसाद कांबळी यांनी केली. 'नाट्य व्यवसायापुढे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संघटनशक्ती मजबुत ठेवा,अभेद्य ठेवा,' असे आवाहन प्रमुख राहुल भंडारे यांनी आभाराच्या भाषणात केले. या कार्यक्रमाला रंगमंच कामगार,बुकिंग क्लार्क व रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'नाट्य निर्माता संघा'चे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव यांनी केले. व्यवस्थापन सहकार्यवाह सुशील आंबेकर यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget