Tina Ambani : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी बिझनेस हाऊसमध्ये लग्न केले असून, 80च्या दशकातील अभिनेत्री टीना मुनीमचे नावही या यादीत सामील आहे. अभिनेत्री टीना मुनीम आता टीना अंबानी (Tina Ambani) या नावाने ओळखली जाते. टीना अंबानीने उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपट जगताचा निरोप घेतला. पण, एक काळ असा होता, जेव्हा टीना आपल्या अभिनयाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करत असे. एवढेच नाही तर, 1975मध्ये तिने 'फेमिना टीन प्रिन्सेस'चा मुकुट जिंकला होता.


टीना अंबानींच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या रिलेशनशिपची देखील खूप चर्चा झाली. टीनाचे नाव बॉलिवूड अभिनेता संजय दत्तशी (Sanjay Dutt) देखील जोडले गेले होते. संजय आणि टीना यांनी संजय दत्तच्या पहिल्या 'रॉकी' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. चित्रपटात काम करत असतानाच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मग ते प्रेमात पडले. पण, हे नाते फार काळ टिकू शकले नाही.


मात्र, 'रॉकी' चित्रपटादरम्यान संजय दत्तला ड्रग्जचे व्यसन जडले आणि तो त्याच्या करिअरकडे आणि नात्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. संजयने टीनाला त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल कधीच सांगितले नाही. संजयचं वागणं आणि त्याच्या व्यसनामुळे त्यांचे नाते संपुष्टात आले.


पहिल्याच नजरेत प्रेमात पडले अनिल अंबानी!


उद्योगपती अनिल अंबानींनी टीना मुनीमला पहिल्यांदा एका लग्नात पाहिलं. टीनाने नेसलेल्या काळ्या साडीवर अनिल अंबानी फिदा झाले होते. यानंतर दोघे फिलाडेल्फियामध्ये भेटले. त्यादरम्यान दोघांच्या एका कॉमन मित्राने त्या दोघांची ओळख करून दिली होती. त्यानंतर अनिल यांनी टीनाला डेटवर येण्याविषयी विचारले. मात्र, टीनाने नकार दिला. तोपर्यंत टीनाला या ‘रिलायन्स’ घराण्याबद्दल काहीच माहिती नव्हती.


यानंतर टीनाची पुन्हा एकदा अनिल यांच्याशी भेट झाली. नंतर वरचेवर भेटी वाढू लागल्या आणि प्रेम फुलू लागले. एका मुलाखतीत टीनाने अनिल अंबानींच्या साधेपणाबद्दल सांगितले होते, 'जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी त्यांच्या साधेपणाने प्रभावित झाले होते. मला ते खूप खरे आणि प्रामाणिक वाटले. ते इतरांसारखे नव्हते. आम्ही भेटलो की, आपापसांत गुजराती भाषेत बोलायचो.’


अभिनेत्री असणं कुटुंबाला नव्हतं मान्य!


टीनाचे अभिनेत्री असणे अंबानी कुटुंबाला मान्य नव्हते आणि कुटुंबामुळे टीना-अनिल यांच्यात दुरावाही आला होता, असे म्हटले जाते. टीना अमेरिकेला गेली होती आणि त्याच वर्षी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भूकंप झाला. त्यादरम्यान टीना तिथेच अडकली होती. त्यावेळी अनिल यांनी टीनाचा नंबर शोधून तिला फोन करून तिची तब्येतीची चौकशी केली आणि त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यानंतर अंबानी कुटुंबाने दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि 1991 मध्ये अनिल अंबानी आणि टीना मुनीमचे लग्न झाले. लग्नानंतर टीनाने फिल्मी दुनियेत कधीच पाऊल ठेवले नाही आणि तिने आपले आडनाव मुनीमवरून बदलून अंबानी केले.


अभिनेत्री टीनाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'देस-परदेस' या सिनेमातून केली होती. यानंतर अभिनेत्रीने 'लूटमार', 'मनपसंद', 'रॉकी', 'सौतन', 'कर्ज', 'मन पासंद', ' बातों-बातों में', 'बडे दिलवाला', 'इझात' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha