Central Bank SO Recruitment 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), मानव संसाधन विकास विभागाने वरिष्ठ व्यवस्थापक आयटी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना centerbankofindia.co.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 10 फेब्रुवारी ते 02 मार्च 2022 या कालावधीत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. बँक 27 मार्च 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा घेईल. ज्यासाठी 17 मार्च 2022 रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील.

Central Bank SO Recruitment 2022 : अपडेट्स जाणून घ्या 

  • अधिसूचना प्रकाशन तारीख : 10 फेब्रुवारी 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2022
  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : 17 मार्च 2022
  • ऑनलाइन परीक्षेची तारीख : 27 मार्च 2022

एकूण 19 पदांची भरती केली जाणार आहे. 10 पदं सामान्य श्रेणीसाठी, 5 ओबीसींसाठी, 1 एसटीसाठी, 2 एससीसाठी आणि 5 EWS साठी राखीव आहेत. या भरतीसाठी संगणक विज्ञान/आयटीमधील अभियांत्रिकी पदवीधर अर्ज करू शकतात. याशिवाय, 6 वर्षांचा पोस्ट अर्हता अनुभव असणं देखील आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इतर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI