Aaditya Thackeray and Ajit Pawar : राज्यातील दोन प्रमुख नेते आज सकाळीच एकत्र पाहायला मिळाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासह पाहणी केल्यानंतर दोन्ही नेते दादरमध्ये (Dadar) चैत्यभूमीजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते. अजित पवार आणि आदित्य ठाकरे दोघेही सकाळी वरळीमध्ये (Worli) पोहोचले आणि त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेऊन स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य केलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. 'पुढे चला मुंबई' अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पहाटेच्या दौऱ्यांसाठी ओळखले जातात. पण अजित पवारांचा आजचा दौरा मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आज उपमुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदार संघाचा पाहणी दौरा केला. तसेच वरळी, दादर भागातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकची पाहणी केली. तसेच वरळी सीफेसचीही पाहणी केली. अजित पवारांकडून वरळी मतदारसंघातील विकासकामांचं आणि सौंदर्यिकरणाचं कौतुक करण्यात आलं. तसेच दुरुस्तीच्या कामांचीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती घेतली.
पाहा व्हिडीओ : वरळीत आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून एकत्र पाहणी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BMC New Wards : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली वॉर्ड पुर्नरचना वादाच्या भोव-यात
- Mumbai Traffic : जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश, मुंबई पाचव्या तर नवी दिल्ली दहाव्या स्थानावर
- BEST: बेस्ट बसचा प्रवास 'तिकीट लेस', 'चलो ॲप'मुळे मोबाईलवरच दिसणार तिकीट
- BMC Election: तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha