Poonam Dhillon : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मिस इंडिया हा किताब पटकाला. कानपूर येथे 18 एप्रिल 1962 रोजी पूनम यांचा जन्म झाला. सोशल मीडियावर आज अनेक चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


त्रिशुल या चित्रपटामधून पूनम यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांना शिक्षणाची आवड होती. पूनम ढिल्लो यांना खरे तर  डॉक्टर व्हायचे होते. त्यांचे वडीलही हवाई दलात एयरक्राफ्ट इंजीनियर होते. पण नंतर पूनम यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 


शशि कपूर यांनी लगावली होती कानशिलात
एका मुलाखतीमध्ये पूनम यांनी सांगितलं होतं, की शशि कपूर यांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शशि कपूर यांना एका सीनमध्ये पूनम यांच्या कानशिलात लगावली पण सीन शूट करण्याआधी याबाबत शशि कपूर यांनी पूनम यांना कोणतीही माहिती दिली नाही. यश चोप्रा यांनी अॅक्शन म्हणताच शशि कपूर यांनी पून यांच्या कानशिलात लगावली. सीनचे शूटिंग झाल्यानंतर शशि कपूर यांनी पूनम यांची माफी मागितली होती. यश चोप्रा यांच्या सांगण्यावरून पूनम यांनी शशि कपूर यांना माफ केलं. 


पूनम यांनी  रमेश सिप्पी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. वडिलांच्या निधनानंतर अशोक थकारिया यांच्या सोबत पूनम यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामधून काही वर्ष ब्रेक घेतला. नंतर पून्हा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली.  


हेही वाचा :