Hanuman Box Office Collection Day 31: तेजा सज्जाचा 'हनुमान' (Hanuman) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असून या एका महिन्यात चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. साऊथचा चित्रपट असूनही हिंदी पट्ट्यातही या चित्रपटाचा दबदबा कायम आहे आणि 'हनुमान'ने आतापर्यंत दमदार कमाई करून इतिहास रचला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केल्यानंतर ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


SACNILC च्या अहवालानुसार, 'हनुमान'ने रिलीजच्या 31 व्या दिवशी 1.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 195.65 कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. 'हनुमान'ने तेलुगूमध्ये सर्वाधिक 141.35 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे.  या चित्रपटाने हिंदी भाषेत दुसरे स्थान पटकावले आहे.  






'हनुमान'ने 50 कोटींची कमाई करुन रचला 'हा' विक्रम


'हनुमान'ने हिंदी भाषेत 50.5 कोटी रुपये कमवले आहेत. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पार करणारा हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 11 वा चित्रपट ठरला आहे. या यादीत यापूर्वी 'बाहुबली 2' (511 कोटी), 'KGF चॅप्टर 2' (435.35 कोटी), 'RRR' (272.80 कोटी), '2.O' (190.50 कोटी), 'सालार' (152.65 कोटी) आणि 'आदिपुरुष' (147.90 कोटी) सह 10 चित्रपटांचा समावेश आहे.


या दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी पट्ट्यातही गाजवले वर्चस्व


'साहो', 'बाहुबली', 'पुष्पा' आणि 'कंतारा'ची नावेही हिंदी पट्ट्यातील 50 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहेत. 'साहो'ने हिंदी पट्ट्यात 145.65 कोटींची कमाई केली होती, तर 'बाहुबली'ने 118.50 कोटींचा व्यवसाय केला होता. 'पुष्पा'ने 106.35 कोटी तर 'कंटारा'ने 84.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या यादीत 'हनुमान'चे नाव 11व्या स्थानी जोडले गेले आहे. ज्याने हिंदी भाषेत 50.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


ही बातमी वाचा : 


Kiran Rao : 'आमिर खानची बायको झाल्यानंतर मी स्वत:ची ओळख गमावली', किरण रावने व्यक्त केली मनातली खंत