Kiran Rao on Divorced with Amir Khan : आजही लोकं मला आमिर खानची (Amir Khan) बायको म्हणूनच हाक मारतात. मी त्यांना सांगते की मी त्याची एक्स बायको आहे. त्यामुळे आमिरची पत्नी झाल्यामुळे मला माझी ओळख गमावल्यासारखं वाटतं, अशी खंत किरण राव (Kiran Rao) हिने व्यक्त केली आहे. बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी काही काळापूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोटही घेतला. पण अजूनही कुठेही गेले तरी लोक आधी मला आमिर खानची बायको म्हणून संबोधतात, असं किरण रावने म्हटलं. 


आमिर खान आणि किरण राव या दोघांचा 16 वर्षांचा संसार मोडला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. पण अजूनही माझी ओळख ही लोकांना आमिर खानची बायको असल्याचं किरण राव हिने 'झूम'ला दिलेल्या एका मुलाखतीदमध्ये म्हटलं आहे. तसेच लोकांना तिला आठवण करुन द्यावी लागते की आता आमिरची एक्स वाईफ आहे, असंही किरणने यावेळी म्हटलं. किरण राव ही सध्या 'लापता लेडीज' या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. 


'माझी आजही ओळख आमिरची पत्नीच'


आमिर खानसोबतच्या नात्यावर भाष्य करताना किरण रावने म्हटलं की, मी जेव्हा विमानतळावर जाते तेव्हाही लोक मला तुम्ही आमिर खानच्या पत्नी ना असा प्रश्न विचारतात. पण त्यांना सांगते की मी त्याची एक्स बायको आहे. अनेकदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला माझं नावही माहित नसतं, पण ते थेट मला आमिरसोबत जोडतात. आता मला या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे. पण मला त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागतं की, मी आता आमिर खानची बायको नाही. पण मला आता याचा त्रास होत नाही. कारण तुम्ही जरी संसार करत असला तरी वैयक्तिक तुमच्या काही आवडी निवडी असू शकतात. त्या तुम्ही जपायलाच हव्यात. प्रत्येकाला संसारात त्याची त्याची स्पेस मिळालयला हवी, जे अत्यंत गरजेचं असतं. 


फक्त बायको म्हणून राहिले असते तर डिप्रेशनमध्ये गेले असते - किरण राव


जर मी फक्त आमिरची बायको म्हणून राहिले असते तर मी नक्कीच डीप्रेशनमध्ये गेले असते. कारण मला माझं आयुष्य आहे, माझ्या आवडी आहेत. जर मी फक्त आमिरची बायको म्हणून राहिले असते तर मी स्वत:ची ओळखही गमावली असती आणि ते माझ्यासाठी डिप्रशेनमध्ये टाकणारं ठरलं असतं. जेव्हा तुम्ही एका सेलिब्रिटीची बायको असता, त्यावेळी तुमच्याविषयी लोकं बोलतात. या गोष्टीचा बऱ्याचदा अनुभव येतो ज्याचा आपल्यावर परिणाम होतो. पण माझ्याबाबतीत असं कधी झालं नाही, कारण आमिर माझ्यासोबत होता. तो जेव्हा होता, तेव्हा त्याने कायमच या गोष्टींपासून मला प्रोटेक्ट केलं, असंही किरण रावने म्हटलं. 


नुकतच आमिर खान आणि किरण राव हे दोघेही आमिर खानची लेक आयरा खान हिच्या लग्नसोहळ्यानिमित्त एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांवरील अनेक चर्चांना उधाण आलं होतं.