एक्स्प्लोर

Haiwaan Box Office Collection: अक्षय कुमार अन् सैफ अली खानच्या 'हैवान'ला प्रेक्षकांनी फिरवली पाठ? दुसऱ्या दिवशी किती कमावले?

Haiwaan Box Office Collection: 'हैवान' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Haiwaan Box Office: प्रदर्शनापूर्वी 'हैवान' (Haiwaan) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. 11 सप्टेंबर 2026 रोजी हा सिनेमा रिलीज झाला.  सुरुवातीला या सिनेमाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला.  पण बॉक्स ऑफिसवर (Box Office) या सिनेमाला फारसं यश मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे.  ओपनिंग डेला हा सिनेमा अधिक कमाई करु शकतो, अशी शक्यता होती. पण तसं घडताना दिसत नाहीये. प्रेक्षकांकडून या सिनेमाला फारसं रिस्पॉन्स मिळत नाहीये. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या सिनेमाने (Box Office Collection) किती कोटींचे कलेक्शन केले? विकेंड असल्यामुळे या सिनेमाला  प्रेक्षकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे की नाही? जाणून घेऊयात.  

'हैवान' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती कोटी कमावले? (Haiwaan Box Office Collection Day 2)

प्रियदर्शन दिग्दर्शित 'हैवान' या सिनेमात सैफ अली खान, अक्षय कुमार, बोमण इरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. श्रिया पिळगावकर आणि सैयामी खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  या सिनेमाने दुसऱ्या दिवशी 2.50 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.   'हैवान' या सिनेमाचे एकूण 5759 शोज पार पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'हैवान' या सिनेमाने पहिल्या दिवशी 3 कोटींचे कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाचे एकूण 7,224 शोज पार पडले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, 'हैवान' या सिनेमाने आतापर्यंत 5.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 6.60 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.   

वर्ल्डवाईड या सिनेमाने एकूण 8.60 कोटींचे कलेक्शन केले असल्याची माहिती समोर आली आहे.  'हैवान' या सिनेमाचे दिग्दर्शन  प्रियदर्शनने केले आहे.  अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'हैवान'  हा सिनेमा 2016 रिलीज झालेल्या  'ओप्पम' या मल्याळम सिनेमाचे हिंदी रिमेक आहे. 'ओप्पम' या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. हा सिनेमा सुपरहिट ठरला. परंतु, हिंदी प्रेक्षकांकडून या सिनेमाला फारसं यश मिळत नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे 'हैवान'  या सिनेमात मोहनलाल यांचा कॅमिओ रोल आहे.   या चित्रपटात श्रिया पिळगावकर, सैयामी खेर आणि बोमण ईरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात ज्येष्ठ कलाकार असरानी यांचीही भूमिका आहे. पण आता असरानी आपल्यात नाहीत.  मिळालेल्या माहितीनुसार,  जेव्हा 'भूत बंगला' या सिनेमाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा  प्रियदर्शन यांनी अक्षयसोबत या सिनेमाविषयी चर्चा केली होती.  यानंतर अक्षयने त्वरित या सिनेमासाठी होकार दिला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

CINTAA Office Actress: पूनम ढिल्लोन, पद्मिनी कोल्हापुरेंसह अभिनेत्रींमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; एकमेकींशी कचाकचा भांडल्या, पोलीस भडकले अन् म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection Day 8 : सलग आठव्या दिवशी रणबीरच्या 'रामायण' सिनेमाचं शॉकिंग कलेक्शन; बॉक्स ऑफिसवर अचानक बदललं आकड्यांचं गणित, किती कमाई झाली?
सलग आठव्या दिवशी रणबीरच्या 'रामायण' सिनेमाचं शॉकिंग कलेक्शन; बॉक्स ऑफिसवर अचानक बदललं आकड्यांचं गणित, किती कमाई झाली?
Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Embed widget