Gulshan Kumar Birth Anniversary : आज प्रसिद्ध निर्माता आणि उद्योगपती गुलशन कुमार (Gilshan Kumar) यांचा स्मृतिदिन आहे. गुलशन कुमार अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक होते, ज्यांनी खूप लवकर यश आणि प्रसिद्धी मिळवली होती. दिल्लीतल्या गुलशन कुमार हळूहळू संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. गुलशन कुमार यांनीही अनेक गायकांची कारकीर्द घडवली. ते चित्रपट निर्मातेही होते.


गुलशन कुमार यांचे पूर्ण नाव गुलशन कुमार दुआ आहे. 5 मे 1956 रोजी दिल्लीतील पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन कुमार यांचे आयुष्यही चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रवासही 'झिरो टू हिरो' बनण्यासारखाच आहे. गुलशन कुमार यांचे वडील चंद्र भान दुआ यांचे दिल्लीतील दर्यागंजमध्ये ज्यूसचे दुकान होते. ज्यामध्ये गुलशन त्याच्यासोबत काम करायचे. मात्र, गुलशन या कामावर कधीच खूश नव्हते. कारण त्यांनी आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला होता. पण परिस्थितीमुळे ते हे काम करत होते.


कॅसेट विकण्याचा व्यवसाय सुरू केला!


स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ज्यूसच्या दुकानासोबतच कॅसेट विकण्याचा व्यवसायही सुरू केला. त्यांनी गाण्यांच्या कॅसेट स्वस्तात विकायला सुरुवात केली. या कामात त्यांना यश मिळाले. त्यांनी नोएडामध्ये 'टी सीरीज' नावाची संगीत कंपनी उघडली. काही काळानंतर ते मुंबईला आले.


'टी सीरीज'ची सुरुवात


टी-सीरीजचे संस्थापक गुलशन यांनी हळूहळू भारतीय संगीत उद्योगात पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघात ते आपल्या मेहनतीनं आणि समर्पणानं बॉलिवूडमध्ये रमले. गुलशन कुमार मूळ गाणी इतर आवाजात रेकॉर्ड करायचे आणि कमी किमतीत कॅसेट विकायचे. यादरम्यान त्यांनी भक्तिगीते रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि ते स्वतः गाणी गायचे. त्यांनी स्थापन केलेली T-Series ही आज हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख संगीत आणि चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे.


चित्रपट निर्माता असण्यासोबतच गुलशन कुमार एक चांगले गायक देखील होते. त्यांनी अनेक भक्तिगीते गायली, जी लोकांना आजही खूप आवडतात. गुलशन कुमार यांच्या आवाजातील 'मैं बालक तू माता शेरा वालीये' हे भक्तिसंगीत लोकांना नेहमीच आवडले आहे. 


गोळ्या घालून झाली हत्या!


गुलशन कुमार हे 1992-93 मध्ये बॉलिवूडचे सर्वात यशस्वी गायक, निर्माता आणि उद्योगपती बनले होते. असे म्हटले जाते की, गुलशन यांनी मुंबई अंडरवर्ल्डच्या खंडणीच्या मागणीपुढे झुकण्यास नकार दिला, ज्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. रिपोर्टनुसार, 12 ऑगस्ट 1997 रोजी सकाळी गुलशन कुमार त्यांच्या एका नोकरासह मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शिव मंदिरात प्रार्थना करण्यासाठी बाहेर पडले होते. त्या दिवशी त्यांच्यासोबत बॉडीगार्डही नव्हता. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा :


Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला


Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर


Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती