Sanskrutik Kala Darpan Awards : सध्या नाट्यसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात प्रेक्षकांना अत्यंत वाईट दिवस बघावे लागले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता आनंदीत ठेवण्यासाठी रंगभूमीवर सध्या अनेक नाटकांचे जोरजार प्रयोग होत आहेत. लवकरच सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धा जल्लोषात पार पडणार आहे.
सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धा आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि त्याच उत्साहात पार पडणार आहे. सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेतील व्यावसायिक नाटकांची नामांकने आता जाहीर झाली आहेत. यात अद्वैत थिएटरच्या इब्लिस या नाटकाला नऊ नामांकने जाहीर झाली आहेत. "चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 24 व्या सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा 2023" कडे संपूर्ण नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या परिक्षणाचे काम शिरिष घाग, भालचंद्र कुबल, रविंद्र आवटी आणि महेश सुभेदार यांनी केले आहे.
सर्वोत्कृष्ट नाटक
इब्लिस
आमने सामने
झुंड
सर प्रेमाचं काय करायचं
थोडं तुझं थोडं माझं
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
लीना भागवत (आमने-सामने)
मयुरा पालांडे (तेरी भी चूप और मेरी भी चूप)
समिथा गुरू (थोडं तुझं थोडं माझं)
नम्रता संभेराव (प्लॅनचेट)
आकांक्षा गाडे (सर प्रेमाचं काय करायचं)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
वैभव मांगले (इब्लिस)
संजय नार्वेकर (थोडं तुझं थोडं माझं)
मंगेश कदम (आमने-सामने)
सौरभ गोखले (गांधी हत्या आणि मी)
अक्षय कोठारी (झुंड)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
मिलिंद शिंदे (इब्लिस)
निरज शिरवईकर (आमने-सामने)
मकरंद देशपांडे (सर प्रेमाचं काय करायचं)
प्रदीप मुळ्ये (झुंड)
स्वप्निल बारोस्कर (थोडं तुझं थोडं माझं)
संबंधित बातम्या