Kailia Posey Death : बालकलाकार कॅलिया पोसीचा (Kailia Posey) वयाच्या 16 वर्षी कार अपघातात मृत्यू झाला आहे. कॅलियाच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 2 मे रोजी कॅलियाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
'टॉडलर्स अॅंड टियाराज' (Toddlers Tiaras) या मालिकेच्या माध्यमातून कॅलिया प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. आता कॅलियाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅलियाचे चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत. कॅलियाच्या हसण्यावर एक GIF देखील आहे.
कॅलियाची आई मार्सी पोसी गॅटरमन यांनी कॅलियाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. कॅलियाच्या आईने फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"माझी लेक आम्हाला सोडून गेली. कॅलियाच्या निधनाने आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे".
संबंधित बातम्या