Riteish Genelia 20 years of togetherness: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडचं ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांच्या या पहिल्या भेटीला नुकतीच 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.


या खास दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्याने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. जेनेलियासोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत, ‘मी जे करतो त्याला प्रेम नाही वेड म्हणतात’ असं रोमँटिक कॅप्शन दिलं आहे. इतकंच नाही तर, एक धमाल डान्स व्हिडीओ देखील शेअर केला आहे.


पाहा पोस्ट :



रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही त्यांच्या हॅपनिंग लाईफबद्दलच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून, ते चाहत्यांचं मनोरंजन देखील करत असतात.


नुतच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे कपल एकत्र नाचताना दिसत आहे. नोरा फतेहीच्या 'नाच मेरी रानी' या गाण्यावर दोघेही धमाल डान्स करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, रितेश त्याच्याच नादात कॅमेऱ्यासमोर विचित्र स्टेप्स करायला लागतो. जेनेलियाला पाहताच ती त्याच्यावर चिडते. मात्र, रितेशवर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही आणि तो आपला डान्स सुरूच ठेवतो. यात वैतागलेली जेनेलिया मात्र रितेशची थेट धुलाईच करते. अर्थात हा या दोघांचा गंमतीशीर व्हिडीओ आहे.


पाहा व्हिडीओ :



हा व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने लिहिले की, '20 हा फक्त एक आकडा आहे. कधीही न संपणाऱ्या प्रवासाला जायचे आहे.’


आता बऱ्याच काळानंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार आहे. रितेश-जेनेलिया 'मिस्टर ममी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल.


हेही वाचा :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha