एक्स्प्लोर

गेहना वशिष्ठला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पॉर्नोग्राफी प्रकरणात गेहनाचा अटकपूर्व जामीन मंजूर

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात गेहना वशिष्ठला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून निकाल मंगळवारी जाहीर केला होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी गेहनाविरोधात आयपीसी कलम 370(मानवी तस्करी) लवण्याची मागणी करत सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे. मात्र गेहनानं या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीनं केलेलं अपील कोर्टानं स्वीकारत गेहनाला अटक न करण्याचे निर्देश जारी केले आहेत. न्यायमूर्ती एस. के कौल आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली.

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळ्यात आल्यानंतर तिनं हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिका याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. गेहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक ती सर्व माहिती आहे. याआधी तिला अटकही करण्यात आली होती. ज्यात चार महिन्यांहून अधिकाकाळ ती कारागृहात होती. ती तुरुंगात असतानाच तिच्याविरोधात दुसरी एफआयआर नोंदविण्यात आली आणि सुटल्यानंतर तिसरी एफआयआर नोंदविण्यात आली.

तिसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडलं. तसेच  वेबसीरिजची दृश्य एक खोलीत काही लोकांच्या उपस्थितीत चित्रीत करण्यात आली. तक्रारदार महिलेनं त्या चित्रपटाचे प्रमोशनही केलं होतं. त्यामुळे इथे पोलिसांकडून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही मोठ्या लोकांची नावं जाहीर करू मग ते आम्हाला जामीन मिळू देतील. तसेच चौथी एफआयआर दाखल करून पुन्हा अटकही होऊ शकते असा आरोप गेहनाच्यावतीनं करण्यात आला. गेहनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बॅंक खात्यांची माहितीही पोलिसांकडे असल्याचं कोर्टात सांगतिलं गेलं होतं. तसेच 133 दिवसांच्या कस्टडीनंतर पुन्हा कस्टडीची गरज काय?, असा सवालही या याचिकेतनं विचारण्यात आला होता.

त्यावर दुसरी एफआयआर दाखल झाल्यांनतर तुम्ही याचिकाकर्ते ताब्यात असताना त्यांच्या सहभागाबाबत चौकशी का केली नाही?, तसेच त्या ओटीटीच्या मालकाला अद्याप का शोधू शकला नाहीत? फेब्रुवारी 2021 मध्ये तुम्ही कोणती माहिती गोळा केली?, आता कोणती नवी माहिती मिळविण्यासाठी तुम्ही याचिकाकर्त्यांची कोठडी मागत आहात?, त्याची माहिती न्यायालयात सादर करा असे प्रश्न उपस्थित करत ही सारी माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. तसेच जर कथित घटना फेब्रुवारीमध्ये घडली तर ती मार्चमध्ये चित्रिकरणासाठी कशी जाऊ शकते?, तसेच एका महिन्याच्या आत एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये वारंवार कशी गुंतू शकते? असे सवालही न्यायालयाने उपस्थित केले होते. मात्र सरकारी पक्षानं याप्रकरणी समोर आलेल्या नव्या पुराव्यांनुसारच गेहनाविरोधात तिसरा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. तसेच साक्षीदारांमध्ये पीडीतांचाही सामावेश असून त्यांनी गेहना वसिष्ठविरोधात थेट आरोप केल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टापुढे मांडली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget