एक्स्प्लोर

नवीन लग्न, नवं घर; गौरव मोरेच्या आनंदाच्या क्षणी हास्यजत्रेचे चेहरेच अनुपस्थित; गैरहजेरीमागचं कारण समोर

हास्यजत्रेतील कलाकारांनी गौरवच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी पाठ फिरवली का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात असताना कलाकारांच्या उपस्थितीचे कारण समोर आले आहे.

Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात लोकप्रीय झालेला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' गौरव मोरे (Gaurav More) सध्या चर्चेत आहे तो त्याच्या नवीन घरामुळे आणि सरप्राइज लग्नाच्या बातमीमुळे. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने प्रेक्षकांना हसवणारा गौरव आपल्या आयुष्याची  नवी इनिंग सुरु करतोय. नवीन घर  आणि जोडीदारासोबत केलेल्या गृहप्रवेशाची चर्चा असतानाच  त्याच्या डबल सेलिब्रेशनमध्ये हस्याजात्रेतल्या चेहऱ्यांची अनुपस्थिती चाहत्यांना जाणवली. मुंबईत हक्काचं घर घेतलं, लग्न केलं पण हास्यजत्रेतील कलाकारांनी गौरवच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी पाठ फिरवली का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात असताना कलाकारांच्या उपस्थितीचे कारण समोर आले आहे.

हास्यजत्रेचे कलाकार का होते  अनुपस्थित?  

गौरवच्या लग्नात, नव्या घराच्या गृहप्रवेशावेळी कुठेही  गौरवची हास्यजत्रेतील पलटण दिसली नाही. समीर चौगुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, शिवाली परब ज्यांनी गौरवसोबत वर्षानुवर्ष प्रेक्षकांना हसवलं ते कलाकार गौरवने शेअर केलेल्या कुठल्याही फोटोमध्ये दिसले नाहीत. त्यांनी स्टोरीही शेअर केली नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण आता हास्यजत्रेतील कलाकारांच्या गैरहजेरीचे कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरवचं घर झालं त्यावेळी आणि लग्नाच्या वेळी हास्यजत्रेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. शिवाली, वनिता, पृथ्विक प्रताप आणि समीर हे सर्वजण परदेशात त्यांचे शो सुरु असल्यामुळे व्यस्त होते. तर  नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत सध्या त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. पण भारतात परतल्यानंतर चाहत्यांना नक्कीच या कलाकारांकडून गौरवचं कौतुक ऐकायला मिळेल यात शंका नाही.

गौरवची पत्नी प्रियांका कारेकर आहे तरी कोण?

गौरव मोरेनं त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं असल्याची माहिती आहे. गौरवची अत्यंत जवळची मैत्रिण ऋतुजा बागवे हिनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ऋतुजासोबत गौरव मोरे आणि त्याची पत्नी दिसत आहे.  या पोस्टला तिनं, 'मिस्टर अँड मिसेस मोरे' असं कॅप्शन दिलं आहे.  या पोस्टमधून गौरवनं लग्न केलं असल्याचं उघड झालं.  प्रियांका कारेकर असं गौरव मोरेच्या पत्नीचं नाव आहे. ती केवळ गौरवची पत्नी नसून, सिने इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा देखील आहे. माहितीनुसार, गौरव मोरेची पत्नी उत्तम अभिनेत्री असून, तिनं अनेक प्रोजेक्टसाठी काम केलं आहे. तिनं आपल्या कारकि‍र्दीत  साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं असल्याची माहिती आहे. तिनं  साऊथ इंडस्ट्रीतील  कलाकार दुलकर सलमानसोबत एका सिनेमासाठी स्क्रीन शेअर केली असल्याची माहिती आहे. तिनं आपल्या पोस्टमधून साऊथ इंडस्ट्रीतील बड्या कलाकारासोबत स्क्रीन  शेअर करतानाचा अनुभव शेअर केला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Rani Mukharjee Award: राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget