एक्स्प्लोर

रुपेरी पडद्यावर 'फुलराणी' अवतरणार; अविस्मरणीय प्रेमकहाणीतून दरवळणार प्रेमाचा नवा सुगंध

'फुलराणी' ही कलाकृती प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय जवळची आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावरची फुलराणी कोण असणार? नेमकी कशी असणार? याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. मात्र त्याआधी 'फुलराणी' पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन  वर्षभराच्या विरामानंतर आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातही नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत. आखून दिलेल्या नियमांचे पालन करून मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला वेग आला आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधून नुकतीच 'फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा झाली आहे.

'पिग्मॅलिअन'वर आधारलेलली 'माय फेअर लेडी' ही म्युझिकल फिल्म जगभर चांगलीच गाजली होती. याच 'पिग्मॅलिअन' कलाकृतीने प्रेरित होऊन 'फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एक वेगळी फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ही कलाकृती चित्रपटाच्या रूपात साकारण्याचे काम सध्या जोरात सुरु झालं आहे.

'फुलराणी' ही कलाकृती प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय जवळची आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावरची फुलराणी कोण असणार? नेमकी कशी असणार? याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. मात्र त्याआधी 'फुलराणी' पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.

'फुलराणी ... अविस्मरणीय प्रेमकहाणी' या कलाकृतीचे लेखन गुरु ठाकूर आणि विश्वास जोशी यांनी केले आहे. गीते बालकवी आणि गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, संकलन गुरु पाटील तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे करीत आहेत. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा हा बहर 2021 ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही 'फुलराणी' प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
The Ring Star Daveigh Chase Dies: सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर
सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget