एक्स्प्लोर

Prathyusha Garimella : साऊथची प्रसिद्ध डिझायनर प्रत्युषा गारिमेलाचा संशयास्पद मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Prathyusha Garimella : टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला (Prathyusha Garimella) तिच्या तेलंगणातील बंजारा हिल्स येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे.

Prathyusha Garimella : टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला (Prathyusha Garimella) शनिवारी (11 जून) तिच्या तेलंगणातील बंजारा हिल्स येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला ही बंजारा हिल्समध्ये राहत होती. शनिवारी दुपारी सुरक्षा तपासणीला तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा, बाथरूममध्ये डिझायनर प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला.

पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत असताना, त्यांना तिच्या खोलीतून कार्बन मोनॉक्साईडची बाटली सापडली. त्यामुळे प्रत्युषाने कार्बन मोनॉक्साईडचा वापर करून आपलं आयुष्य संपवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या बाथरूममध्ये कोळसा होता, याद्वारेच कदाचित तिने वाफ घेतली होती. तिने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

डिप्रेशनशी संघर्ष

प्रत्युषा गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. तिच्यावर उपचारही सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिने आत्महत्या केली आहे का, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात लिहिले होते की, प्रत्युषा आयुष्यात खूप एकटी झाली होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे आणि त्यासाठी ती कोणाला दोषी मानत नाही. मात्र, हे प्रकरण खरंच आत्महत्येचे आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रत्युषाचा स्वतःचा फॅशन लेबल आहे. 'प्रत्युषा गारिमेला' या नावाने कपड्यांचा ब्रँड ती चालवत होती. तिचे फ्लॅगशिप स्टोअर हैदराबाद, मुंबई येथे आहे. याशिवाय डिझायनर इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तिच्या कपड्यांचे प्रमोशन करायची. मात्र, तिच्या अचानक मृत्यूने फॅशन इंडस्ट्रीतील अनेकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा :

Bidisha De : अभिनेत्री बिदिशा डेचं निधन; गळफास घेत केली आत्महत्या

Sangeetha Sajith : दाक्षिणात्य गायिका संगीता साजिथ यांचं निधन, दिग्गजांनी केला शोक व्यक्त

Chethana Raj : कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन; खाजगी रुग्णालयात सर्जरी केल्यानंतर मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
OTT Web Series: अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1
अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Embed widget