Entertainment News Live Updates 9 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2022 07:09 PM
Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धमाका; बॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

Thor Love And Thunder Affected Bollywood Films : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दाक्षिणात्य सिनेमानंतर आता हॉलिवूड सिनेमांनी बॉलिवूड सिनेमांना मागे टाकलं आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाला सोडलं तर सध्या प्रदर्शित झालेले 'जुग जुग जिओ', 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट', 'राष्ट्रीय कवच ओम' सारखे अनेक बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. तर दुसरीकडे 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' धुमाकूळ घालत आहे.

KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'असा' असेल बदललेला नियम

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. 





Laal Singh Chaddha OTT Release : आमिर-करीनाचा 'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर होणार रिलीज

Laal Singh Chaddha OTT Release : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aami Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. 

Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण 7'चा विक्रम; पहिल्याच भागाने केला रेकॉर्ड

Koffee With Karan 7 : सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सहा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सातव्या सीझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या भागाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे. 





Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता' मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी; निर्मात्यांना मिळाली नवी दयाबेन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिनवसांपासून हा शो चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दिशा वकानीनं (Disha Vakani) देखील ही मालिका सोडली. दिशा या मालिकेमध्ये दयाबेन (Dayaben) ही भूमिका साकारत होती. आता दयाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता लवकरच दिशा वकानी यांना एक अभिनेत्री रिप्लेस करणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Nora Fatehi : नोरा फतेही म्हणाली , 'मी प्रेग्नंट नाहीये...', कॉमेडी व्हिडीओ व्हायरल

Nora Fatehi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर  नोरा फतेही (Nora Fatehi)सध्या डान्स दिवाने ज्युनियर्स (Dance Deewane Juniors) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या कार्यक्रमाचे नोरा परीक्षक आहे. डान्स दिवाने ज्युनियर्स  या शोमध्ये लहान मुलं त्यांच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. डान्स दिवाने ज्युनियर्स कार्यक्रमाच्या सेटवरील काही कॉमेडी व्हिडीओ नोरा सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच नोराचा एक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'मी प्रेग्नंट नाहीये...' असं म्हणताना दिसत आहे.


पाहा व्हिडीओ



'काली' दिग्दर्शिकेवर भडकले अशोक पंडित; म्हणाले, 'हे करणारी व्यक्ती हिंदू असेल तर...'

Leena Manimekalai : सध्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहेत. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काहींनी लीना मणिकेलाई यांचे समर्थन केले तर काहींनी या डॉक्युमेंट्रीचा विरोध केला. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित (Ashok pandit) यांनी लीना यांच्या या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार!

Mangesh Desai : ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला आर्थिक मदत त्यांनी केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले.


वाचा संपूर्ण बातमी

Malaika Arora : मलायका नाही तर व्हिडीओमधील एका व्यक्तीनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, 'चाचा ओ चाचा'

Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते. मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ही ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी मलायकाच्या लूकला ट्रोल केलं आहे. पण व्हिडीओमधील मलायकाच्या लूकपेक्षा एका व्यक्तीनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


पाहा व्हिडीओ :



वाढलेली दाढी, डोक्यावर पगडी! ‘Capsule Gill’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा भन्नाट लूक

Capsule Gill Akshay Kumar look : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लगेचच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. अक्षयच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘कॅप्सूल गिल’ (Capsule Gill) असे आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक नुकताच उघड करण्यात आला आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार एकदम वेगळा दिसत आहे.


या लूकमध्ये अक्षय कुमार डोक्यावर पगडी बांधून सरदार बनलेला दिसत आहे. वाढलेली दाढी त्याच्या या लूकला आणखी स्पेशल बनवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाचे नाव ‘कॅप्सूल गिल’ असल्याचे म्हटले जात आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘ड्रीम गर्ल’ने लग्नाला नकार दिला अन् आजन्म अविवाहित राहिले संजीव कुमार!

Sanjeev Kumar Birth Anniversary : ‘शोले’ चित्रपटाचा विषय निघाला की, त्यात ‘ठाकूर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कपूर (Sanjeev Kumar) यांचा चेहरा लगेच डोळ्यासमोर येतो. अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938ला सुरात येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव हरिहर जेठालाल जरीवाला असे होते. नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारे अभिनेते संजीव कुमार यांची पुढे अवघ्या मनोरंजन विश्वाला आपल्या अभिनयाने भुरळ घातली.


वाचा संपूर्ण बातमी

पत्रिका छापल्या अन् सलमान खानसोबतचं लग्नच मोडलं! वाचा अभिनेत्री संगीता बिजलानीबद्दल...

Sangeeta Bijlani Birthday : 80-90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आज (9 जुलै) आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे. 1980मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर संगीताने 1988मध्ये ‘कातिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने ‘त्रिदेव’, ‘हत्यार’, ‘अपराध’, ‘योद्धा’ आणि ‘लक्ष्मण रेखा’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या. संगीता बिजलानी जितकी तिच्या चित्रपटांमुळे ओळखली जाते, तितकीच तिचे सलमान खानसोबतचे (Salman Khan) नाते चर्चेत होते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे.


वैदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी येणार आहेत.


दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली आहे. त्याला चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये? करण जोहरच्या शोमधून मोठा गौप्यस्फोट!


छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमधून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत असतात. या शोच्या 7व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे हजेरी लावणार आहेत. या शोचे प्रोमो देखील प्रचंड चर्चेत आले आहेत. दरम्यान, शोच्या प्रमोशनवेळी करण जोहरने अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.


शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.