Entertainment News Live Updates 8 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Nov 2022 06:17 PM
Ekdam Kadak: 'एकदम कडक' चा टिझर सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

 Ekdam Kadak'एकदम कडक' चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार" या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. 'प्रेम बीम काय नाय बरं का' पासून ते 'प्रेम एकदम कडक हाय' पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय.

Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज

Sumi Marathi Movie: अक्षय विलास बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित 'सुमी' (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित  करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.


'सुमी' 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या (Planet Marathi Ott) माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

Narendra Chapalgaonkar: मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर; खात्रीदायक सूत्रांनी एबीपी माझाला माहिती

Narendra Chapalgaonkar:  मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड करण्यात आली आहे. खात्रीदायक सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज वर्धात पार पडली असून याच बैठकीत 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेय. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यात स्पर्धा  होती. थोड्याच वेळात स्वाध्याय मंदिरात पत्रकार परिषद घेऊन नाव जाहीर होणार आहेत. कोणाचे नाव अध्यक्षपदावर येईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. 

Jitendra Joshi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार जितेंद्र जोशी

Jitendra Joshi On Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. 





Nashik : नाशकात 'हर हर महादेव'चा एकही शो नाही

Nashik : नाशकात 'हर हर महादेव'चा एकही शो लागलेला नाही. किती दिवस बंद राहणार निश्चित नाही.

Avinash Jadhav : मनसैनिक टॉकीज मध्ये आहे त्यांनी राडा करून दाखवावा - अविनाश जाधव

Avinash Jadhav : आज मनसेचा शो आहे, हिम्मत करू नका ! मनसैनिक टॉकीज मध्ये आहे त्यांनी राडा करून दाखवावा - अविनाश जाधव

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे 'वॉर' गाणं चाहत्यांच्या भेटीला

Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर  सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'वॉर' (Vaar) हे नवीन गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या यूट्यूब पेजवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. एका तासात या गाण्याला दोन मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 


Abhijeet Deshpande : संभाजीराजे, उदयनराजेंना सिनेमा दाखवणार : अभिजीत देशपांडे

Abhijeet Deshpande : सिनेमात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. एकही अपशब्द सिनेमात वापरलेला नाही. संभाजीराजे, उदयनराजेंना सिनेमा दाखवणार असल्याचं अभिजीत देशपांडे म्हणाले. 

Abhijeet Deshpande : बखरींचा अभ्यास करुनच सिनेमांची निर्मिती - अभिजीत देशपांडे

Abhijeet Deshpande : बखरींचा अभ्यास करुनच सिनेमांची निर्मिती केल्याचं अभिजीत देशपांडेंनी सांगितलं आहे. 

Abhijeet Deshpande : शाळेतल्या पुस्तकांमधला इतिहास हाच परिपूर्ण इतिहास नव्हे : अभिजित देशपांडे

Abhijeet Deshpande : शाळेतल्या पुस्तकांमधला इतिहास हाच परिपूर्ण इतिहास नसल्याचं मत अभिजित देशपांडेंनी मांडलं आहे. 

Abhijeet Deshpande : आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडला होता : अभिजित देशपांडे

Abhijeet Deshpande : आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडला होता. आम्हाला सेन्सॉर बोर्डाने काही प्रश्न विचारले होते त्यावेळी आम्ही संबंधित इतिहासाचे दाखले तिथे दिलेले आहेत. त्यानंतरच आम्हाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलं. ज्या ज्या पॉइंटवर आक्षेप घेतला जातोय त्याच स्पष्टीकरण आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे दिलेलं आहे. सगळ्या आक्षेपांना आम्ही उत्तर देत बसणार नाही. पण ऑफिशियल स्टेटमेंट आज रिलीज केलं जाईल. 

Abhijeet Deshpande : सेन्सॉर बोर्डाला काहीच वावगं वाटलं नाही : अभिजित देशपांडे

Abhijeet Deshpande : सेन्सॉर बोर्डाला काहीच वावगं वाटलं नाही. आम्ही पुरावे सादर केलेले आहेत. 

Abhijeet Deshpande : ठाण्यातील सिनेमागृहात घडलेला प्रकार लांच्छनास्पद - अभिजित देशपांडे

Abhijeet Deshpande : काल मराठी माणसांना मारहाण केली. ठाण्यातील सिनेमागृहात घडलेला प्रकार लांच्छनास्पद असल्याचं अभिजित देशपांडे म्हणाले आहेत. 

Bigg Boss Marathi 4 : सोयराबाई पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट

Bigg Boss Marathi 4 : Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा वादग्रस्त कार्यक्रम मागे पडला आहे. नुकतेच स्पर्धकांमध्ये 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. 





Har Har Mahadev : 'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार? मनसेकडून आज विवियाना मॉलमध्ये स्पेशल शो

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज विवियाना मॉलमध्ये मनसेकडून स्पेशल शो ठेवण्यात आला आहे. 

vedat marathe veer daudale saat : कोल्हापूरात 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाविरोधात आंदोलन

vedat marathe veer daudale saat : कोल्हापूरात 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाविरोधात आंदोलन सुरू आहे. चित्रपटात वीरांची नावं बदलल्यानं
नेसरीकरांचा संताप होत आहे. 

Har Har Mahadev: विवियाना मॉल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला

Har Har Mahadev : महाराष्ट्र निर्माण सेनेकडून ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाच्या विशेष शोचा आयोजन केल्यानंतर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एसआरपीएफ ची टीम तैनात करण्यात आली आहे

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राला लखनौत विरोध

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या भारतातील प्रवासादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मुंबईनंतर आता प्रियांका लखनौमध्ये आहे. पण लखनौमध्ये तिला विरोध होत असल्याचं दिसत आहे. 





Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांना पोलीस सुरक्षा; 24 तास एक पोलीस कर्मचारी असणारसोबत

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलीय. देशपांडे यांच्यासोबत 24 तास एक पोलीस कर्मचारी असणार आहेत.  सिनेमाला धरून निर्माण झालेले वाद पाहता सुरक्षेच्या कारणास्तव देशपांडे यांना सुरक्षा देण्यात आली आहे. 

Varun Dhawan Health Update : वरूणच्या आजाराचं कळल्यावर चाहते चिंतेत

Varun Dhawan Health Update : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) या आजाराचा सामना करत असल्याची चाहत्यांना माहिती दिली असून आता चाहत्यांचे आभार मानले आहेत. 





Pu La Deshpande : पु. ल. नावाचं गारुड आजही महाराष्ट्राच्या मनावर कायम!

Pu La Deshpande Birth Anniversary : आज पु. ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची 103 वी जयंती आहे. शिक्षक, लेखक, नाटककार, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक, तत्तवज्ञ, आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा निर्माता, संगीतकार, गायक, एकपात्री प्रयोगांचे जनक आणि प्रभावी वक्ता असं पु. ल. देशपांडे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. पु. ल. सर्वांनाच प्रिय असल्याने त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' म्हटलं जातं. 

Rucha Hasabnis : 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो

Rucha Hasabnis baby Boy : साथ निभाना साथिया' (Sath Nibhana Sathiya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचा हसबनीस (Rucha Hasabnis) दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  





Ranbir Kapoor Alia Bhatt : रणबीर कपूरनं लेकीला पहिल्यांदा हातात घेतलं अन्…

Ranbir Kapoor Crys Holing His Baby : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलिया-रणबीरला कन्यारत्न झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लेकीच्या जन्मानंतर रणबीरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. रणणबीरने पहिल्यांदा लेकीला हातात घेतल्यानंतर तो भावूक झाला होता.





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


ठाण्यात अभूतपूर्व राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून गोंधळ, राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने


ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. मात्र या शो बंद करण्यावरून ठाण्यात चांगलाच राडा झाला. आधी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा चालू शो बंद पाडला, प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगितले. मग त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी 2 प्रेक्षकांना मारहाण केली, त्यानंतर मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव एकटे त्याच शोमध्ये आले. त्यांनी पुन्हा शो सुरू केला, राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मी आलो असे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव यांनी नंतर सर्व कार्यकर्त्यांना बोलवले आणि सर्वांना शो बघण्यास सांगितले. पोलीस कार्यकर्त्यांना सोडत नव्हते म्हणून जाधव स्वतः बाहेर आले, पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आत गेले.


Freddy Teaser Out:  'फ्रेडी' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज


Freddy Teaser Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी (Freddy) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. टीझरमधील कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


Varhadi Vajantri: लग्न हा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सोहळा मानला जातो. ते केवळ दोन जीवांचे मिलन नसते, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या नातेवाईकांच्या ऋणानुबंधांचेही मिलन असते. मात्र लग्न सोहळा म्हटलं की मानापमान, रुसवे फुगवेही आलेच. लग्नात कोण, केव्हा आणि  कशावरुन गोंधळ घालेल याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमी जीवांच्या मनात त्यांचे लग्न लागेपर्यंत सतत धाकधूक लागलेली असते. अशीच काहीशी धाकधूक आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पॅडी कांबळेला लागल्याने तो लगीनघाई  करताना दिसतोय. त्याला त्याच्या नव्या लग्नाची जॅम चिंता आहे. नातेवाईकांच्या गोंधळाला आणि त्यांच्या रुसव्या फुगव्यांना तो पुरता घाबरून गेलाय. त्याला त्याच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली आहे. या भीतीपोटी त्याने थेट पुढचं पाऊल उचललं असून लोकप्रिय अभिनेता व समाजसेवक मकरंद अनासपुरे आणि प्रख्यात विनोदी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या मदतीने 'वऱ्हाडी वाजंत्री' घेऊन 11 नोव्हेंबरला बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. 11 नोव्हेंबर हा दिवस कधी उजाडतोय आणि चिं. सौ. का. परी सोबत त्याचं लग्न कधी लागतंय असं त्याला झालंय. 'वऱ्हाडी वाजंत्र्याी'च्या मानधनासह या लग्नाचा सर्व आर्थिक बोजा 'स्वराज फिल्म प्रॉडक्शनतर्फे कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांसह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्व:खुशीने उचलला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.