Entertainment News Live Updates 8 February : शाहरुखची खास पोस्ट; चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर झाला आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटानं भारताबरोबरच परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले.
Love Shaadi Drama Trailer: प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचा (Hansika motwani) विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी पार पडला. हंसिकाच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हंसिकानं बिझनेसमन सोहेल कथूरियासोबत (Sohail Khaturiya) लग्नगाठ बांधली. हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नातील काही किस्से आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहेत. हंसिका आणि सोहेल यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित असणारी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचं नाव 'लव्ह शादी ड्रामा' (Love Shaadi Drama) असं आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Sarla Ek Koti Marathi Movie : मराठी मनोरंजनसृष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत सामाजिक गोष्टींकडेदेखील लक्ष ठेवते. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हे सिनेमे मनोरंजनासोबत प्रबोधनदेखील करत आहेत. आता 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने आपल्या लेकीचं नाव थेट 'सरला' असं ठेवलं आहे.
Nana Patekar: हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोसोबत (Leonardo DiCaprio) काम करण्याचं स्वप्न अनेक कलाकारांचं असतं. सध्या बॉलिवूडमधील कलाकार हॉलिवूडमध्ये जात आहेत. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली होती. पण बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकॅप्रियोटच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं (Anurag Kashyap) एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितलं होतं.
Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस' (Bigg Boss 16) गाजवत आहे. 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले जवळ आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोत, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच स्पर्धकांचा 'टॉप 5'मध्ये (Top 5) समावेश झाला आहे. पण सध्या सर्वत्र शिव ठाकरेच्या खेळीचं कौतुक होत असून त्याला मराठी कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत अनेक मंडळी पाठिंबा देत आहेत.
Kiara Advani Bridal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंनधात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणुक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणुक आयोगाकडे केली आहे.
Celebs Reaction On Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. जैरलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. करण जौहरपासून कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ-कियाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Rakhi Sawant Brother Rakesh Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. दिवसेंदिवस तिच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. नुकतेच तिच्या आईचे निधन झाले आहे. आता तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) फसवणुकीचा आरोप केला आहे. तसेच आदिलनेदेखील राखी सावंतवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान याप्रकरणावर आता राखीचा भाऊ राकेश सावंतने (Rakesh Sawant) मौन सोडलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
राखीचा पती आदिल दुर्रानीला पोलिसांनी केली अटक
Rakhi sawant-Adil Khan Durrani : अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल दुर्रानीला (Adil Durrani) ओशिवरा पोलिसांनी (Oshiwara Police Station) अटक केली आहे. पोलिसांनी आयपीसी (Indian Penal Code) कलम 498 (A) आणि 377 अंतर्गत आदिलला अटक केली आहे. आदिल दुर्रानीला आज सकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर
Rajinikanth -Hema Malini : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांची एकत्रित भूमिका असलेला 'अंधा कानून' (Andhaa Kaanoon) चित्रपट आता ओटीटीवर (OTT) आलाय. ओटीटीवर आल्यामुळे 1983 ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेषकांना आता पुन्हा पाहता येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती आणि त्यांना खूप त्रास दिला होता. लाखो चाहते असलेल्या या दोघांचा चित्रपटाने त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये जोरदार धडाका लावला होता.
Sarja: 'सर्जा' चं पोस्टर प्रदर्शित
Sarja: आतापर्यंत अनेक लव्हस्टोरींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असलं तरी प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण पहायला मिळतंच. 'सर्जा' (Sarja) या आगामी मराठी चित्रपटातही रसिकांना म्युझिकल लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात रसिकांना प्रेमातील आजवर कधीही लाईमलाईटमध्ये न आलेले पैलू पहायला मिळतील. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. कोणताही ओळखीचा चेहरा नसूनही रिलीज करण्यात आलेलं 'सर्जा'चं पोस्टर रसिकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरत आहे.
Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: शुभमंगल सावधान! सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न
Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा पार पडला (Sidharth Malhotra, Kiara Advani wedding) आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. रिपोर्टनुसार, लग्नसोहळ्यासाठी कियारानं पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरची डिझायनर शेरवानी परिधान केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -