Entertainment News Live Updates 7 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sonali Kulkarni : कोरोनाकाळात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) लग्नबंधनात अडकले. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर सोनालीने पुन्हा एकदा कुणालसोबत थाटामाटात लग्न केलं. आता सोनालीने चाहत्यांसोबत तिच्या दुसऱ्या वेडिंग स्टोरीची झलक शेअर केली आहे.
Kaun Banega Crorepati 14 Premiere 7 August 2022 : 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम आहे. यंदादेखील या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांभाळणार आहेत. आज या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
Dagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटोत दिसणारी ही चिमुकली ‘टिप-टिप बरसा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. ज्यांनी हे गाणे ऐकले असेल त्यांना या अभिनेत्रीचे नाव चुटकीसरशी ओळखत येईल!
Anushka Sharma : अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) शेअर केला वर्क आऊट करतानाचा फोटो
Vikrant Rona box office collection : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोणा (Vikrant Rona) हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. पण तरी देखील विक्रांत रोणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी हजेरी लावली आहे.
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 'आई' होणार आहे.
रिलेशनशिप जगजाहीर केल्यापासून अभिनेत्री सुष्मिता सेन आणि उद्योगपती ललित मोदी सतत चर्चेत असतात. नुकताच सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हेकेशन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रात पोहोताना दिसत आहे. सुष्मिताच्या या पोस्टवर ललित मोदींनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं की, 'तू सार्डिनियामध्ये हॉट दिसत आहेस.'
Suresh Wadkar Birthday : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा आज (7 ऑगस्ट) वाढदिवस आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या गायकांमध्ये त्यांच्या नावाची गणना होते. सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमधील आपला आवाज दिला आहे. त्यात 'ओंकारा', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली', 'हिना', 'रंगीला', 'माचीस' इत्यादींचा समावेश आहे.
आम्ही फक्त कॉन्टेंट क्रिएटर आहोत. त्यामुळे आम्ही फक्त लोकांना हसवण्याचं काम करतो. सल्ले देण्याचं काम आम्ही करत नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे. आम्हाला इन्फ्ल्युन्सर समजलं जातं. पण इन्फ्ल्युन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटरमध्ये फरक आहे. असे मत 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) निमित्त एबीपीला दिलेल्या एका मुलाखतीत कॉन्टेंट क्रिएटर सौरभ घाडगेने मांडले आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'एकदा काय झालं'; सलील कुलकर्णी, सुमीत राघवन सांगणार गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट
सर्वसामान्य माणसाला गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात. लोकांचं गोष्टींवरचं हेच प्रेम लक्षात घेऊन, सलील कुलकर्णी आणि सुमीत राघवन हे दोघे जण 'एकदा काय झालं' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणारा हा सिनेमा असणार आहे. याच सिनेमाची पडद्यामागची गोष्ट सुमीत आणि सलील एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये उलगडणार आहेत.
स्वातंत्र्यदिनी '38 कृष्ण व्हिला' नाटकाचा रंगणार अमृत महोत्सवी प्रयोग
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध विषयांवरील नवीन नाटकं रंगभूमीवर दाखल झाली आहेत. काही येऊ घातली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, रहस्यमय, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत असून स्वातंत्र्यदिनी '38 कृष्ण व्हिला'चा अमृत महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.
'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड आऊट
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली युट्यूब वरील वेबसिरीज म्हणजे 'स्ट्रगलर साला'. कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर या मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सहज विनोदी अभिनयाने बहरलेली स्ट्रगलर साला' ही वेब सिरीज आहे. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या बहुचर्चित सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुझान खान लवकरच बॉयफ्रेंड अरसलान गोनीसोबत अडकणार लग्नबंधनात
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझान खानने घटस्फोट घेतला असला तरी त्यांची अजूनही मैत्री आहे. हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सुझान अरसलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे. तर दुसरीकडे हृतिक आणि सबा लग्न करणार अशा चर्चा होत आहेत. अशातच सुझान अरसलान गोनीसोबत लग्नबंधनाच अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
'टकाटक 2' मध्ये दिसणार 'अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचे नवे रूप
मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले. यापैकीच एक आहे 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं 'हृदयी वसंत फुलताना...' हे 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. 'टकाटक 2'च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -