Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारे मालिकेमधून एक्झिट घेणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता उर्मिलानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन या मालिकेबद्दल एक माहिती दिली आहे.
Rhea Chakraborty IIFA 2022: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) अबुधाबीला जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती 2 जून ते 5 जून या दरम्यान अबूधाबीमध्ये आयोजित ‘आयफा’ (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होती. कोर्टातून जामिनावर सुटलेली रिया चक्रवर्ती हिने ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स’ (NDOS) अंतर्गत परदेश प्रवासासाठी कोर्टाची परवानगीही घेतली होती. पण, तरीही ती अबुधाबीला जाऊ शकली नाही.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने रिया चक्रवर्तीवर 2020पासून परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रियाने आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती. अभिनेत्रीने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला काही अटी शर्थींसह परवानगी दिली होती. पण, रिया चक्रवर्ती विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आल्याने तिला परदेशात जाता आलेले नाही. परदेश प्रवासासाठी अर्ज दाखल करताना, रिया चक्रवर्तीच्या विरोधात एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसबद्दल तिला माहिती नव्हती.
Sussanne Khan, Hrithik Roshan : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) ही जोडी घटस्फोट घेऊन वेगळी झाली असली, तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. मुलं हृहान आणि ह्रदान यांच्या सहपालकत्वापासून ते कुटुंबातील कोणत्याही उत्सवापर्यंत, हे जोडी आजही एकत्र दिसते. नुकताच हृतिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारणही तसं खास आहे.
नुकताच हृतिक एका कार्यक्रमादरम्यान सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत फोटो पोज देताना दिसला होता. यानंतर त्याने सुझानच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. त्याने तिला ‘सुपरस्टार’ म्हटले आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानने (Shah Rukh Khan) शुक्रवारी (3 एप्रिल) 'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटचा टीझर रिलीज केला. सोशल मीडियवर हा टीझर शेअर करुन करताना शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये , शाहरुख त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेला, हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी बसलेला दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून त्याचे चाहते थक्क झाले.
Samrat Prithviraj : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून, या चित्रपटाने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसोबत, अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला आहे. मात्र, आता या चित्रपटाला एका मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. याचा या चित्रपटाच्या कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो.
या चित्रपटात अक्षय आणि मानुषीसोबत आशुतोष राणा, संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. बॉक्स ऑफिसवरचा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे, असे म्हणता येईल.
S. P. Balasubrahmanyam : आपल्या आवाजाने सगळ्याच रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एस.पी. बालासुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam) यांचा आज (4 जून) वाढदिवस. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील. साऊथचं नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या आवाजाची जादू निर्माण केली होती. कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले.
एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खान पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस.पीं.चा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस.पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.
बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरीजचा सीझन 3 नुकताच रिलीज झाला आहे. आता या सीरीजच्या चौथ्या सीझनचा टीझर शेअर करण्यात आला आहे. हे पाहिल्यानंतर चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत.
शाहरुख खाननेत्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असल्याचं समोर आलं आहे. तसेच जखमी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात उघड झालं आहे.
पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 23 जखमांच्या खुणा होत्या. किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी गेळी लागली होती. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागावर लागल्या होत्या. तर तीन ते चार गोळ्या त्यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर तीन ते पाच सेंमीपर्यंतच्या जखमा आढळल्या आहेत.
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -