Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज रविवारी (दि . 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर कुशावर्त तीर्थ परिसराची देखील त्यांनी पाहणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभागी झाले. यावेळी युवा उद्योजकांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली प्रश्न विचारले. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. 


प्रश्न - तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल आहे? 


उत्तर -  जी खुर्ची मिळते, तिला कम्फर्टेबल बनवून घ्या.  


प्रश्न - कुंभमेळा अनुषंगाने कशी तयारी सुरू आहे?


उत्तर : सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या संस्कृतीबाबत लोकांना महत्त्व पटत आहे.  कुंभमेळा आकर्षित होत आहे. नाशिक मध्ये 2015 च्या कुंभमेळ्यात कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडला नाही. कुंभमेळा हा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू. हा आस्थेचा महाकुंभ होईल. टेक्निकली महाकुंभ होईल. इथली प्रशासकीय टीम सक्षम आहे. सर्व लोक काम करतात. प्रयागराजचा अनुभव पाहता मी तिथे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पण संवाद साधला. त्या  ठिकाणी 18 तास ते ड्युटी करत होते. कोणी तक्रार करत नव्हतं, ते म्हणत होते आम्हाला कुंभमेळ्याने ताकद दिली. 


प्रश्न - नाशिकचा कुंभमेळा कसे असेल आणि आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू?


उत्तर - भारत हा एक अशी सभ्यता आहे याचं कारण म्हणजे आमची आस्था आहे. प्रयागराज येथे कोट्यावधी लोक आले, कोणीही कोणाला जात धर्म विचारला नाही. सर्व आस्थेने गेले, स्नान केले हे येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचे आहे. विकासासोबत हे देखील महत्वाचे आहे. कुंभमेळा स्वागताची आणि पर्यटनाची एक संस्कृती आणतो. एका कुंभमेळ्याने उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था बदलली. नाशिक आणि महाराष्ट्राचे युवा या कुंभमेळ्यात जोडले गेले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने ते जोडले गेले पाहिजे.  


प्रश्न - मी इतिहासाची गोष्ट सांगत आहे. मी आठ वर्ष मागे जात आहे. इतिहासात तुम्ही वादा केला होता नाशिकला मी....? 


उत्तर - हा वादा मला चांगला लक्षात आहे. नाशिकला मी दत्तक घेतले आणि सरकार गेले. जे नाशिकला मिळाले पाहिजे ते मिळत नाही. मुंबईचा फायदा नाशिकला सुरुवातीला होत होता, तसा आता नाही. जेवढी कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत नाशिकची पाहिजे होती, तेवढी नाही. नाशिकला एक विकासाची संधी मिळेल. समृद्धी हायवेवर मल्टीमेडल कॅरिडोर सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज नाशिकला मिळेल. जेएनपीटी पोर्ट कनेक्टिव्हिटी साडेतीन तासाची होईल. देशाचा सर्वात मोठा पोर्ट वाढवण येथे बनवत आहे. जेएनपीटी पेक्षा तीन पट मोठ पोर्ट बनवत आहोत. जेव्हा ते तयार होईल तेव्हा नाशिकसाठी समृद्धी हायवेवरून एक ग्रीन फिल्ड रोड त्या ठिकाणी नाशिकवरून तयार होईल. त्याचा नाशिकला फायदा होईल. नाशिक आज महाराष्ट्राचे मोठे डेव्हलप शहर आहे. अजून खूप काही बाकी आहे जे मी तेव्हा ठरवलं होतं, ते पूर्ण करण्याचा या पाच वर्षात प्रयत्न करेल.   


प्रश्न - नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? 


उत्तर - आम्ही नाशिकला पालकमंत्री देऊ, जोपर्यंत पालकमंत्री नसतात, त्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. 


प्रश्न - एआय, आयटी टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात कशी असणार? 


उत्तर - आपण जेव्हा एआयची गोष्ट करतो, एआय हे 22 करोड जॉब कमी करेल आणि 24 करोड वाढवले असा सर्वे झाला. नवीन संधी तयार होत आहे. स्मार्टफोन नवीन आले, त्यावेळी लोकांना अडचणी आल्या. मात्र, आता सर्व वापरत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्र्यांनी विचारले होते की, 8 रुपये 75 पैसे मी डिजिटल करू शकतो का? ते आज होत आहे. पान टपरीवाला, भाजीवाला सगळेच डिजिटल पेमेंट घेत आहेत. एआयच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलप करू. टाटा इन्स्टिट्यूटने दहा हजार महिलांना एआय टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एआयचा उपयोग सांगितला पाहिजे, त्याची भीती दूर केली पाहिजे. एआयच्या माध्यमातून आपण नवीन शिखरापर्यंत पोहोचू शकू.  


प्रश्न - ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कसा प्रयत्न कराल?  


उत्तर - नाशिक हे कृषी इकॉनोमी आहे. 14000 करोडचे द्राक्ष इथून एक्स्पोर्ट झाले आहेत. काही मॉडेल नाशिकला तयार केले आहेत. व्हॅल्यू चेंज मॉडल नाशिकला तयार केले आहे. जपानच्या केचप बनवणाऱ्या कंपनीसारख्या कंपनीने नाशिकच्या शेतकऱ्यांनी एग्रीमेंट केलं, त्यांच्यासाठी पीक घेत आहे. कृषीला टेक्नॉलॉजीने जोडून घेतले पाहिजे. स्मार्ट ॲग्री बिजनेस योजना मी राज्यात सुरू केली. सगळ्या गावात क्रेडिट सोसायटी असते. त्यांचं डिजिटल लाईजेशन करून मल्टीपर्पज सोसायटी करून ॲग्री बिझनेस सोसायटीत करू. सध्या दहा हजार गावात काम सुरू आहे. 


प्रश्न - राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था कशी सुधारणार?  


उत्तर - नागपूरची घटना चार तासात आटोक्यात आली. दंगा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले. 104 लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्यांनी नुकसान केलं, त्यांच्या मालमत्ता विकून त्यांच्याकडून पैसे वसूल करू. जे दंगे करतील त्यांना भोगावे लागेल.  



आणखी वाचा 


इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO