Entertainment News Live Updates 31 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Javed Akhtar : लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र'च्या पुढील भागाबद्दल बोलताना अयान मुखर्जी म्हणाला, "ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा देवच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'ब्रह्मास्त्र 3'च्या शूटिंगला एकत्र सुरुवात होणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित व्हायला आणखी तीन वर्षे लागतील". त्यामुळे 2026 मध्ये 'ब्रह्मास्त्र 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Post Office Ughad Aahe Marathi Serial : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकांनीदेखील या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Song : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता सिनेमातील 'बथुकम्मा' (Bathukamma) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Raavrambha Marathi Movie : गेल्या काही दिवसांत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे यशस्वी ठरत आहेत. लवकरच 'रावरंभा' (Raavrambha) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13) हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. संगीतप्रेमी गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आता जवळ आला आहे. लवकरच या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता या पर्वात कोण बाजी मारणार याकडे संगीतप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलेलं आहे की,"मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदूंची भीती वाटते, हिंदूनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केले आहे". हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"ही आहे सावरकर विचारांची धार".
Karan Johar Koffee With Karan 8 : सिने-निर्माता करण जौहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. लवकरच या बहुचर्चित कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
Mrs Undercover Trailer Released Now: अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही ओटीटी क्विन म्हणून ओळखली जाते. राधिकाच्या ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राधिका तिच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. राधिकाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता ती लवकरच एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधिकानं मिसेस अंडरकव्हर (Mrs Undercover) या चित्रपटामध्ये एका स्पाय एजंटची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
The Elephant Whisperers: ऑस्कर-2023 (Oscar 2023) हा पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास ठरला. कारण या सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीतील पुरस्कार जिंकले. 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे केअर टेकर्स यांची गोष्ट मांडण्यात आली आहे. नुकतीच 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगानं (Guneet Monga) नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
ती परत आलीय... धमाकेदार लूकसह जेनिफर विंगेटचे इन्स्टाग्रामचे पुनरागमन, एका महिन्यानंतर शेअर केल्या किलर अदा
Jennifer Winget Comeback On Instagram: टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र ती गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवरून गायब होती. आता या अभिनेत्रीने धमाकेदार पुनरागमन केले असून तिच्या पुनरागमनाने चाहतेही खूश आहेत. जेनिफर विंगेटने एका जबरदस्त लूकसह इन्स्टाग्रामवर कमबॅक केलं आहे.
जेनिफर विंगेटने (Jennifer Winget) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकामागून एक असे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जेनिफर विंगेटचा किलर लूक पाहायला मिळत आहे. तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे, तेच फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. ब्लू-रेड प्रिंटेड लेहेंग्यात जेनिफरची स्टाईल पाहण्यासारखी आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
Maidaan Teaser: 'मैदान में उतरेंगे...'; अजयच्या मैदानचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस
Maidaan Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. नुकताच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता त्याचा मैदान (Maidaan) हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. अजयनं सोशल मीडियावर मैदान या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजयनं मैदान या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Anushka Sharma: अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका; विक्री कर विभागाच्या थकबाकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली
Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हायकोर्टानं दणका दिला आहे. 2012-13 आणि 2013-14 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाकल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत. तिथं दिलासा नाही मिळाला तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे. लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असा सवाल हायकोर्टनं अनुष्काला विचारला आहे. विक्रीकर विभागाचा युक्तिवाद हायकोर्टानं मान्य केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -