Entertainment News Live Updates 30 January : कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर झाला हल्ला

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Jan 2023 03:58 PM
Pathaan Box Office Collection : जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Pathaan Box Office Collection : 'पठाण' हा सिनेमा आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 542 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानचा चाहतावर्ग जगभरात आहे. जगभरातील शाहरुखचे चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत. जगभरातील अनेक सिनेमागृहात या सिनेमाने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवला आहे. 

Aarya 3 Teaser : आधी घेतला सिगरेटचा झुरका, नंतर बंदुक केली लोड; सुष्मिताच्या 'आर्या सीजन 3' च्या टीझरची जोरदार चर्चा

Sushmita Sen Aarya Season 3 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'आर्या' (Aarya) या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून लवकरच या वेबसीरिजचा तिसरा सीझन (Aarya 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये सुष्मिताचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 





Pathan: ब्लॅक जॅकेट, टोपी अन् तोंडावर मास्क; पठाणला मिळणारा रिस्पॉन्स पाहण्यासाठी दीपिका पोहोचली मुंबईच्या थिएटरमध्ये, लूकनं वेधलं लक्ष

Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा पठाण (Pathan) चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. थिएटरमधील पठाण चित्रपटाच्या शो दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण, बेशरम रंग या गाण्यावर थिएटमध्ये थिरकताना दिसत आहेत. थिएटरमध्ये पठाणला मिळणारा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी नुकतीच दीपिका मुंबईमधील (Mumbai)  एका थिएटरमध्ये गेली. यावेळी दीपिकानं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 













 















Raveena Tondon : 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tondon On Padmashri Award : सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tondon) 'पद्मश्री पुरस्कार'  (Padmashri Award) जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली,"माझ्या कामाची दखल घेत पद्मश्री पुरस्कारासाठी माझी विचारणा केल्याबद्दल खूप आनंद होत आहे". 





February OTT Release : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज

The New Release On OTT : सिनेप्रेक्षकांसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच खास असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात 'द ग्रेट इंडियन मर्डर 2' (The Great Indian Murder 2) पासून ते तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) 'लूप लपेटा'पर्यंत (Loop Lapeta) अनेक दर्जेदार वेबसीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. 

Varun Dhawan Reveals ; वरुण धवनने खुलासा केला की तो एका 'सिक्रेट' प्रोजेक्टसाठी चित्रीकरण करत आहे

वरुण धवनने खुलासा केला की तो एका 'सिक्रेट' प्रोजेक्टसाठी चित्रीकरण करत आहे; अभिनेता शूटमधून घरी परतताना इन्स्टा स्टोरी शेअर करतो



Pathaan OTT Release: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे, त्याच्या थिएटरीयल रननंतर


Shah Rukh Khan celebrates 'Pathaan' success : शाहरुख खानने चाहत्यांसह 'पठाण'चे यश साजरे केले

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने सोमवारी आपल्या सर्व चाहत्यांचे प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.


Kailash Kher : कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला

तेरी दीवानी आणि चांद सिफारीश यांसारख्या गाण्यांना गायन देण्यासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर अलीकडेच कर्नाटकमधील एका मैफिलीदरम्यान कथितरित्या हल्ला करण्यात आला, जेव्हा दोन व्यक्तींनी एक कन्नड गाणे गाण्याची मागणी करत त्यांच्यावर पाण्याची बाटली फेकली.

अमिताभ बच्चन यांनी महिला अंडर-19 संघाचे अभिनंदन केले


Pathaan : पठाणबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी दीपिका सिनेमा हॉलला भेट

पठाण या नवीन चित्रपटाला लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील हे पाहण्यासाठी दीपिका सिनेमागृहात भेट.

अंडर 19 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर महिला क्रिकेटपटूंचं जबरदस्त सेलिब्रेशन; काला चष्मावर थिरकली टीम

Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023)  इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन केले. 


पाहा व्हिडीओ:





Pathan: किंग खानचा जबरा फॅन... मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती गेला 'पठाण' पहायला; पाहा व्हिडीओ

Pathan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण  (Pathaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. शाहरुखच्या काही चाहत्यांना पठाण पाहण्यासाठी अख्खं थिएटरबुक केलं. पठाण चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर अनेक जण गर्दी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती त्याच्या मित्राच्या पाठीवर बसून पठाण चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचं दिसत आहेत. 



Athiya Shetty: 'सिंदूर आणि मंगळसूत्र...'; केएल राहुलची पत्नी अथिया झाली ट्रोल

Athiya Shetty: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty weds KL Rahul) यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. नुकताच अथियाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अथिया कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी अथियाला ट्रोल (Athiya Shetty Troll) केलं आहे. 



Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."

Virender Sehwag Share Post About Pathan :  पठाण (Pathaan) हा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण पठाण चित्रपटामधील डायलॉग्सचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. नुकतीच क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) पठाण चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विरेंद्रनं थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पठाणमधील शाहरुख खानचा एक सिन दिसत आहे. विरेंद्रच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  



Vishakha Subhedar: "किती मूर्ख होतो आपण..."; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Vishakha Subhedar Post Viral On Social Media: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. तिचा विनोदी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे विशाखाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचं कुर्रर्रर्रर्र हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. तसेच, विशाखा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील काम करते. विशाखानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


KL Rahul Athiya Shetty : ए नाचो!!! केएलनं शेअर केले संगीत सोहळ्यातील खास फोटो, अथियासोबत थिरकला केएल राहुल


KL Rahul Athiya Photos : बहुचर्चित असं क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. लग्नाला आता आठवडा होत आला असला तरी अजूनही या लग्नाची चर्चा आहे. कधी लग्नातील गिफ्ट तर कधी आणखी काही सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरुच आहे. त्यातच आता नवरोबा केएल राहुलने संगीत सोहळ्यातील काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यात केएल-अथियाचा खास आनंदी अंदाज दिसून येत आहे.


Vicky Kaushal : अनुराग कश्यपसाठी विकी कौशल झाला डीजे, सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज


Vicky Kaushal First Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विकी आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) आगामी सिनेमात झळकणार आहे. 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' (Almost Pyaar With DJ Mohabbat) असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमातील विकीचा लूक समोर आला असून या सिनेमात विकी 'डीजे'च्या भूमिकेत दिसणार आहे. 














Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला; चार दिवसांत 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!




















Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 


डॉ.परशुराम खुणेंना पद्मश्री पुरस्कार अन् झाडीपट्टीची उपेक्षित रंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत! - झाडीपट्टीच्या रंगभूमीबाबत सर्वकाही...








zadipatti theatre news today : विदर्भातील झाडीपट्टीचे ज्येष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुणे (parshuram Khune Padmashree) यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. झाडीपट्टी नाट्यसृष्टीच्या एखाद्या कलावंताला पद्मश्री सारखा पुरस्कार घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानिमित्ताने अतिशय लोकप्रिय असलेली मात्र तेवढीच उपेक्षित असलेली झाडीपट्टी रंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.






 






 























- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.