Entertainment News Live Updates 30 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. या शोमध्ये अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी देखील हजेरी लावली आहे. अश्विनी भावे यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार समीर चौघुलेनं खाल गिफ्ट दिलं आहे.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यामध्ये अनेकवेळा वाद होतात. सध्या आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजी ही अनघावर चिडली आहे. अनघा, अरुंधती आणि संजना हे आजीला समजवून सांगताना दिसत आहे.
Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 15 वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' (Rab Ne Bana Di Jodi) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) झळकली होती. अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत तिने स्वत:ला सिद्ध केलं.
Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील गाण्यांना, चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात अंकुश चौथरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली असून अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Salman Khan Wedding : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहे.
Google Doodle: सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (30 एप्रिल) एक खास डूडल तयार केलं आहे. गूगलनं अभिनेते एलन रिकमन (Alan Rickman) यांचे खास डूडल (Google Doodle) डिझाईन केलं आहे. हॅरी पॉटर आणि डाय हार्ड सारख्या चित्रपटांमुळे एलन रिकमन यांना विशेष लोकप्रियता मिळाली . 30 एप्रिल 1987 रोजी एलन रिकमनने 'लेस लियझन्स डेंजेरियस' (Les Liaisons Dangereuses) या ब्रॉडवे प्लेमध्ये काम केले. त्यामुळे आज गूगलनं त्यांचे खास डूडल डिझाइन करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पाहा गूगलचं खास डूडल:
Sheezan Khan In Khatron Ke Khiladi 13 : शीझान खान (Sheezan Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'अली बाबा : दास्तान ए काबुल' (Ali Baba : Dastan E Kabul) या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. शीझान 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) शेवटचा दिसला होता.
Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. या मंचावर मनोरंजनसृष्टीतील मंडळीसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीदेखील हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) येणार आहेत.
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात गेल्या आठ दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेसने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. कॉंग्रेस नेते सलमान अनीस सोज (Salman Anees Soz) यांनी अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांनादेखील कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
Mumbai : मुंबईतील गोरेगाव भागात राहणाऱ्या छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने (Actress) तिच्या सहकलाकारावर लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार (Mumbai actress rape case) केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अभिनेत्याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळली त्यामुळे अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Box Office : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Ponniyin Selvan 2 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास झाला आहे.
Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य
Moradabad Fashion Designer Muskan Narang Suicide : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर (Fashion Designer) मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत तिने आयुष्य संपवलं आहे.
मुस्कान नारंगच्या वडिलांनी म्हणजेच चंद्रप्रकाश नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान मुंबईवरुन आल्यापासून ती नैराश्याचा सामना करत असल्याचं मला जाणवलं होतं. ती आली तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि झोपण्यासाठी ती तिच्या खोलीत निघून गेली. सकाळी आम्ही तिला आवाज दिला पण ती बाहेर आलीच नाही. त्यावेळी आम्ही खिडकीतून तिला डोकावून पाहिलं तेव्हा ती पंख्याला लटकलेली दिसून आली.
Sairat : 'सैराट' सात वर्षांचा झाला जी!
Akash Thosar On Sairat Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' हा मराठी सिनेमाला आज सात वर्ष झाली आहेत. सात वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्यामुळे आकाश ठोसरने (Akash Thosar) खास पोस्ट लिहिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -